कोकण

योगसाधनेतून ‘रोगमुक्त’ जीवन जगा

CD

37146

योगसाधनेतून ‘रोगमुक्त’ जीवन जगा

शेखर बांदेकर ः सावंतवाडीत फिटनेस योग शिबिर

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १३ ः नियमित योगाभ्यास हा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नसून मन:शांती, एकाग्रता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक आहे. सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि विविध योगासने यांच्या माध्यमातून आपण निरोगी जीवनशैली अंगीकारू शकतो. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने किमान काही वेळ योगासाठी द्यावा, असे आवाहन फिटनेस योग अकॅडमीचे योगशिक्षक शेखर बांदेकर यांनी येथे केले.
येथील कळसुलकर हायस्कूल येथे फिटनेस योग अकॅडमी, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत एक दिवसीय फिटनेस योग शिबिरात श्री बांदेकर बोलत होते. यावेळी फिटनेस किड्स ॲकॅडमीचे जिल्हाध्यक्ष विशाल लातये, फिटनेस योग ॲकॅडमीचे कोषाध्यक्ष रवींद्र प्रभूदेसाई, कक्षा प्रमुख रामनाथ सावंत, सह कक्षा प्रमुख महादेव सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. बांदेकर यांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष योगाभ्यास करून घेतला. यामध्ये सूर्यनमस्कार, विविध योगासने, सूक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम यांचा समावेश होता. तसेच कठीण आसनांचाही सराव करून घेण्यात आला. योगाभ्यासाबरोबरच आरोग्यवर्धक पदार्थांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. नियमित योगाभ्यास केल्यास आपण रोगमुक्त राहू शकतो, त्यामुळे प्रत्येकाने योग आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा, असे आवाहन प्रशाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. घुरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: ५ कोटींच्या सोन्याची तस्करी, भाजप नेत्यासह ७ जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले; मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

Police Adhikshak Tushar Patil Death : अपर पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांचे निधन; वयाच्या ४५ व्या वर्षी प्राणज्योज मालवली

Abhijeet Dipke: भाजप-IT सेल भारतीय, बाकी पाकिस्तानी? हिंदू-मुस्लिम करून नोकऱ्या मिळत नाहीत; अभिजित दिपकेंची सरकारवर टीका

India-Nepal Dispute: सीमा वादावर नेपाळचा मवाळ सूर! भारताविरोधात संघर्ष नव्हे, संवाद हवा, परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

IND vs AFG Test, 2nd Day: भारताच्या साडेपाचशे धावा अन् अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत; पदार्पणवीर मानव सुतार चमकला

SCROLL FOR NEXT