कोकण

जिल्ह्यात माकडतापाची पुन्हा धास्ती

CD

जिल्ह्यात माकडतापाचे पाच रुग्ण
ग्रामस्थांत पुन्हा धास्ती ः बांद्यासह दोडामार्ग तालुक्यात संसर्ग
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १३ : बांदा व दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दिवसांत माकडताप बाधित पाच रुग्ण आढळल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सापडलेल्या रुग्णात बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका आरोग्य कर्मचाऱ्याचादेखील समावेश आहे. सर्व रुग्णांची प्रकृती ठणठणीत असून त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी सुरू आहे. याच कालावधीत काजू बागायतीत सहा माकडेदेखील मृतावस्थेत आढळल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर यांनी दिली आहे.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात बांदा निशाण परिसरातील काजू बागेत सातत्याने माकडे मृतावस्थेत आढळली होती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांना याबाबत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिल्याने आरोग्य यंत्रणेने परिसरात सर्वेक्षण सुरू केले होते. या वेळी मृत माकडांच्या परिसरातील गोचिडी गोळा करत त्या तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविल्या होत्या. प्राप्त अहवालात यातील ५० टक्के गोचिडी या दूषित आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. बांदा निशाण व बांदा सटमटवाडी परिसरात आरोग्य पथकाकडून सर्वेक्षणाचे काम सुरू केले. यामध्ये शहरात सटमटवाडीत परप्रांतीय कामगार माकडतापबाधित आढळला. याच परिसरात सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक आरोग्य कर्मचारीदेखील बाधित आढळला. दोन्ही रुग्णांची प्रकृती ही ठीक असून त्यांच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले. त्यांची सध्या दररोज वैद्यकीय तपासणी सुरू असल्याची माहिती बांदा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी दिली आहे.
दोडामार्ग तालुक्यात तळकट प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कोलझर येथे २ रुग्ण तर मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आडाळी येथे १ रुग्ण माकडताप बाधित आढळला आहे. तिन्ही रुग्ण हे काजू बागायतीत काम करणारे परप्रांतीय कामगार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सर्वांची प्रकृती ठीक असून त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. मात्र आरोग्य विभाग त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेऊन आहे.


डीएमपी तेल लावून
शेतकऱ्यांनी बागेत जावे
सध्या काजू हंगाम बहरात असल्याने स्थानिक शेतकरी काजू बी गोळा करण्यासाठी बागायतीत जात आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून माकडताप बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना डीएमपी तेलाचे वाटप केले आहे. काजू बागायतीत जाताना दूषित गोचीडींचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी डीएमपी तेल लावूनच शेतकऱ्यांनी बागेत जावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सध्या या परिसरात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू आहे. तापाची लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway survey : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीपूर्वी पहाटे शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; माळशिरस तालुक्यात शेतकरी संतप्त

Paithan Murder Case: अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी शिवसेना नगरसेवकाविरुद्ध गुन्हा, पैठणमध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या

Team India T20 Captain: सूर्यकुमारला T20 कॅप्टन्सीवरून काढणार, मग भारताच्या नेतृत्वासाठी पर्याय कोण? हे तिघे शर्यतीत आघाडीवर

Donald Trump Iran War Powers : ट्रम्प यांना मोठा झटका! इराणविरोधातील संघर्ष थांबवण्यासाठी संसदेत प्रस्ताव, स्वतःच्या पक्षानेही दिला धक्का

Son kills Father Kolhapur : वडील रोज दारू पिऊन आईला मारायचे, चिकन तोडणाऱ्या मुलाने वैतागून बापालाच तोडलं; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT