कोकण

भिंगळोलीत विठ्ठल-रखुमाई मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

CD

rat14p9.jpg-
37225
भिंगळोली: नव्या मंदिरात श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेताना ज्योती कदम, अस्मिता केंद्रे व अन्य.

भिंगळोलीत विठ्ठल-रखुमाई केमूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १४ ः मंडणगड तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने भिंगळोली येथे नूतन विठ्ठल मंदिराचा लोकार्पण आणि श्री विठ्ठल-रखुमाई मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा १२ रोजी उत्साहात झाला. या मंगल सोहळ्यानिमित्त ११ ते १४ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण भिंगळोली परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे.
मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला, ११ रोजी मंडणगड येथील नूतन विद्यामंदिर ते भिंगळोली दरम्यान दिंडी मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाचा गजर आणि ''ज्ञानबा-तुकाराम''च्या जयघोषात तालुक्यातील वारकरी बांधव मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. १२ एप्रिल रोजी विधीवत मूर्ती प्राणप्रतिष्ठा पार पडली. या चार दिवसीय महोत्सवात कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, महाआरती, तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचे आयोजन ले आहे. तसेच महिलांसाठी हळदी-कुंकू आणि भाविकांसाठी दर्शन सोहळा व भजन-हरिजागराचे कार्यक्रम होत आहेत. या सोहळ्याला जि. प. अध्यक्षा अस्मिता केंद्रे आणि ज्योती कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून दर्शन घेतले. हरिनाम सप्ताहानिमित्त कीर्तन करण्यात आले. यावेळी दिलीप शिंदे (पंढरपूर), दगडू बैकर, राजेश आंबडस्कर, अनंत पवार यांच्या कीर्तन व प्रवचनाचा लाभ भाविकांनी घेतला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिताराम शिंदे, विजय माने, दगडू बैकर, रमेश शिंदे, नथूराम मोरे, महादेव खामकर, चंद्रकांत जगताप, सुरेश सुगदरे, रवेश नाडकर, विश्राम म्हाब्दी, संदीप वाघे, जयश्री गुजर, सखाराम माळी, प्रमोद काटकर, अशोक नटे, नथूराम भुवड, अनंत येलमकर, काशीनाथ भोसले, गजानन गोपाळ, दामोदर दिवेकर व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT