कोकण

राजापुरातील पालखी नृत्य स्पर्धेत गांगोबा करंबेळे संघ प्रथम

CD

rat14p13.jpg-
37232
राजापूर ः जिल्हास्तरीय पालखीनृत्य स्पर्धेतील विजेत्या गांगोबा करंबेळे संघाला पारितोषिक देताना रविंद्र नागरेकर आणि मान्यवर.

राजापुरातील पालखी नृत्य स्पर्धेत
गांगोबा करंबेळे संघ प्रथम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १४ ः केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त, ''रविदादा मित्रमंडळ'' आणि ''एनआर प्रतिष्ठान''च्या वतीने निमंत्रितांच्या जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेत गांगोबा करंबेळे संघाने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकाविले. स्पर्धेतील पालखी नृत्याच्या तालबद्ध आणि चित्तथरारक अविष्काराने राजापूरकरांची मने जिंकली.
राजापूर हायस्कूलच्या पटांगणावर पार पडलेल्या द्वितीय क्रमांक फ्रेंड्स ग्रुप, देवरुख तर तृतीय क्रमांक बाळगोपाळ पाटगाव यांना मिळाला आहे. संघांच्या सांघिक कामगिरीसोबतच त्यांच्या तांत्रिक कौशल्याचाही गौरव करण्यात आला. त्यामध्ये उत्कृष्ट देखावा व ताशा साठी बाळगोपाळ पाटगाव संघ, उत्कृष्ट ढोलवादन गांगोबा करंबेळे संघ ठरला.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांनी पौराणिक कथांवर आधारित विलोभनीय देखावे सादर केले होते. ढोल-ताशांच्या तालावर पालखी नृत्याचे जे प्रकार सादर झाले, त्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. नवलादेवी शेढे ढोलपथकाने केलेल्या विशेष ढोलवादनाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. या स्पर्धेचे उद्घाटन रविंद्र नागरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. बक्षीस वितरण प्रसंगी नगरसेवक दिलीप चव्हाण, दिलीप अमरे, दिनानाथ कोळवणकर, महेश नकाशे, प्रविण नागरेकर, श्रृती ताम्हणकर, शितल रहाटे, राष्ट्रीय कबड्डी पंच मोहन पाडावे, परीक्षक वैभव पवार आणि स्वप्नील गुरव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka CM: कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? तारीख आली समोर, डीके शिवकुमार २५वे मुख्यमंत्री होणार

Pune Civic Funds: पुणे महापालिकेला समाविष्ट ३२ गावांचा जीएसटी परतावा थकित; १८८६ कोटींअभावी पायाभूत विकास अडखळला

Latest Marathi Update Live: विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका आणि इतर मुद्द्यांवरून भोपाळमध्ये आंदोलन

तो ३०- ४० जण घेऊन माझ्या घराजवळ... पुसदमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेवर टोळक्याकडून हल्ला; नेमकं काय घडलं?

Karnataka CM : DK शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार; नव्या मंत्रिमंडळात कोणाला लागणार लॉटरी?

SCROLL FOR NEXT