कोकण

कोकिसरे भुयारी मार्ग काम कासवगतीने

CD

37265

कोकिसरे भुयारी मार्ग काम कासवगतीने

वाहतूक अडथळे सुरूच; जोडरस्त्याला अजून मुहूर्त सापडेना

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १४ : तळेरे-कोल्हापूर मार्गावरील कोकिसरे रेल्वेफाटकांजवळ सुरू असलेल्या भुयारी मार्गाचे काम सुरू होऊन दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. परंतु, तरीदेखील हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. एका बाजूच्या जोडरस्त्याला अजून सुरुवातदेखील झालेली नाही. हा भुयारी मार्ग दिवाळीनंतरच सुरू होण्याची शक्यता आहे.
तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोकिसरे येथील रेल्वेफाटक हे रेल्वे सुरू झाल्यापासून वाहनचालकांची डोकेदुखी ठरले आहे. चोवीस तासांत तब्बल चौदा ते पंधरा तास हा मार्ग फाटकामुळे बंद राहत असतो. त्यामुळे २००८ पासून कोकिसरे रेल्वेफाटकाला पर्यायी व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी जोर धरू लागली. माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेफाटकावर आंदोलन देखील छेडले होते. त्यानंतर उड्डाणपूल की भुयारी मार्ग, यावर अनेकदा चर्चा झाली. अखेर कोकण रेल्वे महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी संयुक्त सर्वेक्षण केल्यानंतर भुयारी मार्गावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
भुयारी मार्ग आणि संलग्न रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ६४ कोटी रुपये निधी मंजूर केला. सुरुवातीची दीड-दोन वर्षे भूसंपादन प्रक्रिया आणि इतर प्रक्रियेत गेली. दोन वर्षांपूर्वी प्रत्यक्षात भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात झाली. अतिशय जोखमीचे काम असल्याने कोकण रेल्वेच्या देखरेखीखालीच हे काम सुरू आहे. वर्षभर रेल्वे ट्रॅकला कोणताही धक्का न लावता ट्रॅकखाली बसवण्यासाठी काँक्रीटचे दोन बोगदे बाजूलाच तयार करण्यात आले. गेल्या वर्षी मे महिन्यात पर्यायी रेल्वे ट्रॅक उभा करून तयार केलेले दोन्ही बोगदे ट्रॅकखाली सरकवण्यात आले. त्यामुळे महत्त्वपूर्ण आणि जोखमीचे काम पूर्ण झाले. परंतु, त्यानंतर आता दहा-बारा महिन्यांचा कालावधी उलटला तरीदेखील भुयारी मार्गालगत अजूनही काँक्रिटीकरणाचे काम सुरूच आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अजूनही महिना-दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सध्या हे काम खूपच धिम्या गतीने सुरू आहे.
दरम्यान, भुयारी मार्गाच्या पश्चिमेकडील जोडमार्गाचे काम पंधरा-वीस दिवसांपासून सुरू झाले आहे, तर पूर्वेकडील काम अजूनही सुरू झालेले नाही. त्यामुळे या महिन्यात आणि गणेशोत्सवातदेखील रेल्वेफाटकाचा सामना वाहनचालकांना करावा लागणार आहे. महिना-दीड महिन्यानंतर पावसाळा सुरू होईल, त्यानंतर जोडरस्त्याचे काम करणे शक्य होणार नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबरनंतर हे काम सुरू होणार आहे. त्यामुळे भुयारी मार्ग दिवाळीनंतर किंवा त्यानंतरच सुरू होण्याची शक्यता आहे.
-----------
ऐन हंगामात डोकेदुखी
तळेरे-कोल्हापूर या ८९ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गापैकी ३४ किलोमीटरचे काँक्रिटीकरण शिल्लक आहे. उर्वरित महामार्गाचे काँक्रिटीकरण झाल्यामुळे या मार्गावरून वाहतूक वाढली आहे. मे महिन्यात या मार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ होते. याशिवाय गणेशोत्सव कालावधीत वाहतूक दुप्पट ते तिप्पटीने वाढते. या कालावधीत रेल्वेफाटकावरील वाहनांच्या रांगा दोन ते तीन किलोमीटरपर्यंत जातात. त्यामुळे हे रेल्वेफाटक त्या कालावधीत सर्वाधिक डोकेदुखी ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhayandar: मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास नकार, महिलेचा आरोप; प्रताप सरनाईकांचा संताप

Crime: कर्जत-खोपोली मार्गावर अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

Latest Marathi Update Live: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा मांढरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर हवालदारला सीबीआय कोठडी

खेकडेच राहणार तुम्ही... रितेश देशमुखच्या त्या व्हिडीओवरून नेटकऱ्यांमध्येच जुंपली; चाहत्यांनी ट्रोलर्सना सुनावलं; नेमकं प्रकरण काय?

Kolhapur Rice Theft : गोदामातून तांदळाची 72 पोती चोरणाऱ्या तीन महिलांना अटक; मध्यरात्री टेम्पो बोलावून नेली पोती

SCROLL FOR NEXT