रत्नागिरीत महात्मा फुले जयंती साजरी
रत्नागिरी, ता. १३: क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जयंती द्विशताब्दी वर्ष महोत्सवाचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे झाला. यानिमित्त शासकीय वसतिगृहामध्ये आयोजितील विविध स्पर्धेतील प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरव करण्यात आला.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ आणि सामाजिक न्याय विभाग यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन ११ एप्रिल रोजी केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व्याख्याते प्रा. आनंद शेलार यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक अपूर्वा कारंडे, महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रकाश आरेनवरू आणि वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक विजया मोरे आदी उपस्थित होते.
प्रा. आनंद शेलार यांनी व्याख्यानातून महात्मा फुले यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडले. ‘‘क्रांतिसूर्यांचे जीवनचरित्र हे समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे,’’ असे सांगत त्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. सहायक संचालक अपूर्वा कारंडे यांनी प्रबोधनपर काव्य सादर करून महात्मा फुले यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.