कोकण

वायरी भूतनाथ येथे १९ ला ‘पारंपारिक शिवजन्मोत्सव’

CD

वायरी भूतनाथ येथे १९ ला
‘पारंपारिक शिवजन्मोत्सव’

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १४ : शिवजयंती उत्सव मंडळ, वायरी भूतनाथ यांच्यावतीने यावर्षीही ‘पारंपारिक शिवजन्मोत्सव २०२६’ चे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात आयोजन करण्यात आले आहे. येत्या १९ आणि २० एप्रिल रोजी वायरी भूतनाथ येथील टिकम शाळेमागे या निमित्ताने विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी १९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवरायांच्या जयघोषात ही मिरवणूक पार पडेल. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायण महापूजा व महाआरती संपन्न होईल. सायंकाळी ७ वाजता सर्व भाविकांसाठी महाप्रसाद व तीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात येणार असून सायंकाळी ७.३० वाजता सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम रंगणार आहे. पहिल्या दिवसाची सांगता एका धमाकेदार कार्यक्रमाने होईल. रात्री ९.३० वाजता रसिकांच्या मनोरंजनासाठी ‘ओमी डान्स ॲकॅडमी वेंगुर्ला’ पुरस्कृत ‘नटरंग’ हा बहारदार व्हरायटी शो सादर केला जाणार आहे.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी २० एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता कोकणची वैभवशाली लोककला असलेल्या दशावतार नाटकाचे आयोजन केले आहे. ‘बाळ दांडेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, दांडी’ यांच्यावतीने ‘अंजनी हनुमान युद्ध’ हा थरारक आणि पौराणिक नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. दिग्दर्शक वसंत परब यांच्या कल्पक दिग्दर्शनातून साकार होणाऱ्या या नाटकात प्रेक्षकांना ‘ट्रिकसीन’चा अद्भुत अनुभव पाहायला मिळेल. वायरी भूतनाथ येथील टिकम शाळेमागे संपन्न होणाऱ्या या दोन्ही दिवसांच्या सर्व कार्यक्रमांचा महापूजेचा आणि महाप्रसादाचा सर्व शिवप्रेमी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन ‘शिवजयंती उत्सव मंडळ वायरी भूतनाथ’ यांच्यावतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT