कोकण

गोळवलीत विशाल कांबळेंची पाषाण शिल्पकारी जोमात

CD

rat14p11.jpg
O37230
संगमेश्वर ः गोळवली येथे पाषाण शिल्पकारीतून घडवलेल्या मूर्ती.
-----------

विशाल कांबळेंची पाषाण शिल्पकारी जोमात
गोळवलीत ओबडधोबड दगडांना फुटली वाचा ; देवी-देवतांच्या आकर्षक मूर्ती
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १४ : आधुनिक यंत्रसामग्रीच्या हायटेक युगात हाताने केलेल्या कलेचे महत्त्व कमी होत असताना, कोल्हापूरच्या एका कलाकाराने मात्र आपल्या छिन्नी-हातोड्याच्या जोरावर दगडालाही जिवंतपणा मिळवून दिला आहे. गेली काही वर्षे मुंबई-गोवा महामार्गावरील गोळवली (ता. संगमेश्वर) येथे वास्तव्यास असलेले विशाल कांबळे हे आपल्या हस्तकलेतून पाषाणातून देवी-देवतांच्या मोहक मूर्ती साकारत आहेत.
मूळचे कोल्हापूरचे असलेल्या विशाल कांबळे यांनी आपल्या वडिलांकडून पाषाण शिल्पकलेचा वारसा घेतला. चार वर्षांपूर्वी ते व्यवसायानिमित्त कोकणात आले. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तासनतास दगडावर घाव घालताना हाताला, बोटांना जखमा झाल्या; मात्र कलेवरची श्रद्धा आणि जिद्द त्यांनी ढळू दिली नाही. आज त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत असून, पंचक्रोशीत त्यांची ओळख एक निष्णात ''पाषाण शिल्पकार'' म्हणून झाली आहे. श्री. कांबळे यांच्या हातातील कौशल्यामुळे काळोख्या पाषाणातून श्रीगणेश, दुर्गामाता, खंडोबा, महाकाली, हनुमान अशा विविध देवी-देवतांच्या आकर्षक मूर्ती साकारतात. केवळ मूर्तीच नव्हे, तर काळाच्या ओघात दुर्मिळ होत चाललेले दगडी जाते, उखळ, खलबत्ता, पाटा-वरवंटा अशा गृहोपयोगी वस्तूही ते तयार करतात. मार्बलसह पांढऱ्या आणि काळ्या दगडातील त्यांच्या कामाला विशेष मागणी असते.
--------------
चौकट
कुटुंबाची भक्कम साथ
निसर्गाने दिलेल्या चौसष्ट कलांपैकी एक कला जरी आत्मसात केली, तरी ती कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे सक्षम साधन बनू शकते, हे कांबळे यांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या या कामात त्यांचे कुटुंबीयही खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. विशेष म्हणजे, त्यांची उच्चशिक्षण घेणारी मुलगी, मुलगा आणि पुतण्या शिक्षणासोबतच या पारंपरिक व्यवसायात त्यांना मदत करतात.
----
कोट
पाषाण कला कष्टसाध्य आहे, पण त्यात एक वेगळा आनंद आहे. आपल्या मातीतील ही कला टिकवून ठेवतानाच कुटुंबाचा आधार होण्याचे समाधान मोठे आहे.
- विशाल कांबळे, शिल्पकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT