IPL 2026: आनंद गगनात मावेना... पाटिदारसह, विराटने धरला ठेका, ढोलच्या गजरात बंगळुरूच्या खेळाडूंचा धुमाकूळ; RCB ने शेअर केला भारी Video

RCB IPL 2026 Victory Celebration Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६ स्पर्धा जिंकल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केले. बंगळुरूच्या खेळाडूंनी ढोलच्या गजरात ठेका धरल्याचेही दिसले. बंगळुरूने सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Virat Kohli, Rajat Patidar Dance |  IPL 2026 Final | RCB vs GT

Virat Kohli, Rajat Patidar Dance | IPL 2026 Final | RCB vs GT

Sakal

Updated on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. बंगळुरूने रविवारी (३१ मे) गुजरात टायटन्सला अहमदाबादमध्ये त्यांच्याच घरच्या मैदानात ५ विकेट्सने पराभूत केले आणि सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले.

रजत पाटिदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वातील बंगळुरू (RCB) असा केवळ तिसराच संघ ठरला ज्यांनी सलग दोन आयपीएल ट्रॉफी जिंकल्या. याआधी असा पराक्रम केवळ एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने केला होता.

Virat Kohli, Rajat Patidar Dance |  IPL 2026 Final | RCB vs GT
IPL 2026 फायनलनंतर मोठी घटना! गुजरात टायटन्सच्या बसला आग, वाचा नेमकं काय घडलं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com