कोकण

चिपळूण-मिरजोळीतील विद्यार्थ्यांची जलाशय स्वच्छता मोहीम

CD

ratchl१४५.jpg-
O37292
चिपळूण ः स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले दलवाई हायस्कूलचे विद्यार्थी.
-----------

मिरजोळीतील विद्यार्थ्यांची
जलाशय स्वच्छता मोहीम
दलवाई हायस्कूलचा उपक्रम ; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
चिपळूण, ता. १४ ः चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथे दलवाई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता आणि जलसंधारणाचा संदेश देत जलाशय व परिसर स्वच्छतेची व्यापक मोहीम राबवली.
गांधी तीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेअंतर्गत दलवाई हायस्कूल, मिरजोळी येथील विद्यार्थ्यांनी विविध स्वच्छता उपक्रम राबवले. यामध्ये मिरजोळी खोरी येथील जलाशय परिसरातील झुडपे, गवत व कचरा हटवून स्वच्छता करण्यात आली. अडकलेला प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला तसेच बंधाऱ्याची दुरुस्ती करून जलसंधारणास हातभार लावण्यात आला.
दशक्रियाविधी घाट आणि सार्वजनिक विहिरी परिसरातही स्वच्छता करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला. “पाणी वाचवा, जीवन वाचवा” अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. ई-वेस्ट व प्लास्टिकच्या धोक्यांबाबत संदेश देत कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. मुख्याध्यापक रोहित जाधव, शिक्षिका संध्या बोराटे, संतोष तांबे, मिलिंद जाधव व सुनील जाधव यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सहभागातून मोहीम पार पडली. सरपंच विनोद पवार यांनी उपक्रमाचे कौतुक केले. “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात शाळेला यश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT