कोकण

राजापूर-देवाचेगोठणे येथे पर्यावरणपूरक प्रकल्पांची मागणी

CD

पर्यावरणपूरक प्रकल्पांची
देवाचेगोठणे येथे मागणी
ग्रामस्थांचा ठराव : विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार
राजापूर, ता. १३ : ग्रामीण भागातील सुशिक्षित युवक रोजगाराअभावी त्रस्त असल्याने देवाचेगोठणे येथील ग्रामस्थांनी पर्यावरणपूरक प्रकल्प उभारण्याची मागणी आमदार किरण सामंत यांच्याकडे केली. गावात झालेल्या सभेत या संदर्भात एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.
शेतीपूरक व्यवसाय, सेंद्रिय शेती, पर्यटन व लघुउद्योग यांना चालना दिल्यास स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होऊ शकते, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. तसेच या प्रकल्पांसाठी शासनाकडून निधी व मान्यता मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली. सभेला विविध पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त करत आमदार सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविण्यात आला.
देवाचेगोठणे येथे ग्रामस्थांच्या झालेल्या सभेमध्ये राजापूर तालुका विकासासह बेरोजगारी दूर करण्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये सौरऊर्जा प्रकल्प, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, मत्स्यव्यवसाय, ग्रामीण पर्यटन विकसित करणे आदी विषयांच्या अनुषंगाने चर्चा होवून त्याबाबतचे प्रस्ताव मांडण्यात आले. या सर्व प्रस्तावांचा विचार करून पुढील कार्यवाहीसाठी एक समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT