कोकण

रत्नागिरी-क्राईम

CD

झाडगावमध्ये हातभट्टी दारु विक्रीवर कारवाई
रत्नागिरी ः शहरातील झाडगाव झोपडपट्टी येथील पडीक घराच्या पाठीमागे विनापरवाना गावठी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ९५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिसात संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (ता. १२) सायंकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली. एक वृद्ध महिला विनापरवाना गावठी दारुची विक्री करत असताना सापडली. तिच्या कडून साहित्यासह ९५० रुपयांची गावठी दारु जप्त केली.
------------
वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
रत्नागिरी ः शहरानजीकच्या आरे समुद्रकिनारी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह काळबादेवी येथील फडजीवाडी-मारुती मंदिर येथील समुद्र किनारी आढळला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. निशांत राजेश ठाकरे (वय २४, रा. डोंबिवली वेस्ट लोटेवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १२) सकाळी सव्वासातच्या सुमारास निदर्शनास आली. शनिवारी (ता.११) सायंकाळी चारच्या सुमारास खबर देणार अंकितकुमार राकेशकुमार सिंह व त्यांचे मित्र हे आरे बीचवर समुद्रात पोहायला गेले असता पाण्यात पोहताना निशांत ठाकरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याचा मृतदेह रविवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास काळबादेवी येथे पोलिस पाटील व पोलिसांना आढळला.
----------
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान प्रकरणी प्रौढावर गुन्हा
पावस ः तालुक्यातील कुर्धे-गणेशगुळे फाटा येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. रमिझ युसुफ गावखडकर (वय ४०, रा. गावखडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १३) रात्री सव्वाआठच्या सुमारास कुर्धे-गणेशगुळे फाटा येथील कातळावर निदर्शनास आली. रमिज गावखडकर हे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस नाईख प्रशांत लोहळकर यांनी पूर्णगड पोलिसात तक्रार दिली.
-----------
खलाशाचा समुद्राच्या पाण्यात पडून मृत्यू
रत्नागिरी ः बोटीवर काम करणारा खलाशी पाण्यात पडून बेशुद्धावस्थेत सापडला. उपचारासाठी त्याला वाटद-खंडाळा आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अरविंद गोविंद नितोरे (वय ४७, रा. फुणगुस, थुळवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत खलाशाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १३) साडेआठच्या सुमारास घडली. अरविंद नितोरे हे सुरेश धातकर यांच्या बोटीवर कामाला होते. बोटीवरील कामगार सखाराम मासेकर हे घरी पाणी आणण्याकरिता गेले होते. पुन्हा बोटीवर आले असता अरविंद नितोरे कुठेही दिसला नाही. शोधाशोध करत असताना पाण्यात जाळे टाकून पाहिले असता अरविंद हा बेशुद्धावस्थेत जाळ्यात सापडला होता.
--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT