कोकण

आग लावल्याने स्थानिकांची तारांबळ

CD

37379

आग लावल्याने स्थानिकांची तारांबळ

अनोळखीचे कृत्य; मळेवाड जकातनाका येथील प्रकार

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १४ : मळेवाड जकातनाका येथे अज्ञाताने आग लावली. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
मळेवाड जकात नाका येथे आज दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमुळे येथील ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. मळेवाड शाळा नंबर १ जवळील जागेत अनोळखी व्यक्तीने लावलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. मात्र, येथील स्थानिकांच्या अथक प्रयत्नांने ही आग अटोक्यात आली. ही आग वेळीच अटोक्यात आणली नसती तर, बाजूला असलेल्या शाळा, तसेच काजू बागेची मोठी हानी होऊन अनर्थ घडला असता. सदरची आग लागली हे लक्षात येताच काही जागृत ग्रामस्थांनी मुरकरवाडी व नाईकवाडीतील काजू बागायदार मालकांना घटनेची माहिती दिली. तेथे स्थानिकांनी धाव घेत आग अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, वेळीच आग आणल्याने मोठा अनर्थ टळला.
--
पर्यावरणाची हानी, नागरिकांना सूचना
उन्हाळ्याच्या काळात कोरड्या गवताला, कचऱ्याला किंवा जंगल परिसरात आग लावू नये. अशा कृतीमुळे मोठ्या प्रमाणात आग पसरून जीवित व मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. वन्यजीवांना धोका निर्माण होतो तसेच पर्यावरणाची हानी होते. कोठेही आग लागल्याचे आढळल्यास तात्काळ संबंधित यंत्रणेला कळवावे.
---
आग अटोक्यात आणताना घ्या काळजी!
आग अटोक्यात आणताना स्वतःची सुरक्षितता प्रथम प्राधान्य द्यावी. हातमोजे, मास्क, ओले कापड यांचा वापर करूनच आगीजवळ जावे. वाऱ्याच्या दिशेचा अंदाज घेऊन विरुद्ध बाजूने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा. पाणी, माती किंवा उपलब्ध साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी. मोठी आग असल्यास स्वतः प्रयत्न न करता तात्काळ अग्निशमन दलाला कळवावे. विद्युत तारा किंवा ज्वलनशील पदार्थांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT