कोकण

चिपळूण ः संतोष हुमणे यांचा छत्रपती वॉरिअर्स संघ विजेता

CD

rat15p16.jpg-
37479
चिपळूण - स्पर्धेत विजेता ठरलेला छत्रपती वॉरियर्स संघ.

‘चारगाव प्रीमिअर लीग’मध्ये छत्रपती वॉरियर्स अजिंक्य
श्री रामवरदायनी क्लब; पाली भुवडवाडी मैदानावर रंगला थरार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ : श्री रामवरदायनी क्रिकेट क्लब, पुणे आयोजित ''चारगाव प्रीमिअर लीग'' (CPL) या क्रिकेट स्पर्धेत संतोष हुमणे यांच्या ''छत्रपती वॉरियर्स'' संघाने दिमाखदार विजय मिळवत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात चुरशीच्या लढतीत निशांत मोहिते यांचा ''विहाना इलेव्हन'' संघ उपविजेता ठरला.
पाली भुवडवाडी येथील मैदानावर ही स्पर्धा पार पडली. चारगाव मर्यादित असलेल्या या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे खेळाडूंसाठी पहिल्यांदाच ''लिलाव प्रक्रिया'' राबवण्यात आली होती. यामध्ये ६ संघमालक आणि ७२ खेळाडू सहभागी झाले होते. अतिशय शिस्तबद्ध आणि खिलाडूवृत्तीने पार पडलेल्या या स्पर्धेचे चिपळूण आणि खेड तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी कौतुक केले.
या स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण जिल्हा परिषद सदस्या दीप्ती महाडिक, चारगाव कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षणविस्तार अधिकारी विजय थोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी निरबाडेचे सरपंच रोहन महाडिक, प्रशांत महाडिक, दीपक महाडिक, अशोक साळवी, महेंद्र थोरे, उदय मोहिते, सुरेश भुवड, शंकर तांबिटकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रथम क्रमांकाला १५ हजार रुपये रोख व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांकाला १० हजार रुपये रोख व आकर्षक चषक देऊन सन्मानित केले गेले. निरबाडे, पाली, खांदाट (ता. चिपळूण) आणि काडवली (ता. खेड) या चार गावांतील ग्रामस्थांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. श्री रामवरदायिनी क्रिकेट क्लब पुणेच्या सदस्यांसह मुंबई-पुण्यातील चाकरमानी आणि स्थानिक क्रिकेटप्रेमींनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
सूत्रसंचालन मनोज काजवे यांनी केले तर अमेय सुर्वे, सुनील लांबे आणि आर्यन मोहिते यांनी आपल्या खुमासदार शैलीत समालोचन करून सामन्यांमध्ये रंगत भरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

SCROLL FOR NEXT