कोकण

रत्नागिरी ः कंझ्युमर्स शॉपीला प्रारंभ

CD

rat15p5.jpg-
37472
रत्नागिरी : कंझ्युमर्स शॉपीचे बुधवारी फीत कापून उद्घाटन करताना नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे. सोबत प्रशांत पटवर्धन, मीनल मोहाडीकर व नगरसेविका प्रिती सुर्वे, निवेदिता कळंबटे, मेधा कुळकर्णी, जागृती पिलणकर, रूक्सार खान, आफ्रिन होडेकर आदी.

रत्नागिरीत कंझ्युमर्स शॉपीचे उद्घाटन
१९ एप्रिलपर्यंत प्रदर्शन; ६०हून अधिक स्टॉल
रत्नागिरी, ता. १५ : येथील पटवर्धन हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित कंझ्युमर्स शॉपीचे उद्घाटन नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनी केले. विविध कंपन्या, स्थानिक उद्योजक, महिला उद्योगिनींच्या विविध स्टॉलला भेट देऊन त्यांनी माहिती जाणून घेतली. हे प्रदर्शन १९ एप्रिलपर्यंत रोज सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सर्वांना विनामूल्य खुले आहे.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमित्र फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, महिला व बालकल्याण सभापती प्रिती सुर्वे, नगरसेविका मेधा कुळकर्णी, जागृती पिलणकर, निवेदिता कळंबटे, रूक्सार खान, आफ्रिन होडेकर, उद्योजक आनंद देसाई आदी उपस्थित होते. या वेळी कंझ्युमर्स शॉपीच्या संस्थापिका मीनल मोहाडीकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनाची संकल्पना राबवताना संपूर्ण कुटुंब आणि त्यातील प्रत्येकाच्या गरजा यांचा विचार अतिशय बारकाईने करण्यात आलेला आहे. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाला काही ना काही खरेदी करता येईल, असे प्रदर्शन असल्याचे मोहाडीकर यांनी सांगितले.
या प्रदर्शनात हँडीक्राफ्ट, ज्वेलरी, साडी, लेदर पर्सेस, लेडीज गारमेंट, लखनवी फुलकारी, गारमेंट्स, टॉप्स, फूड प्रोडक्ट्स, पापड, हेल्थकेअर प्रोडक्ट्स, चहा, सौंदर्यप्रसाधने, वॉटरप्युरिफायर, नॉनस्टिक कूकवेअर, ओव्हन्स, सूईंग मशिन, मिक्सर, फूड प्रोसेसर, अगरबत्ती, कार्पेट्स, बेडशिट्स, लहान मुलांचे कपडे, फर्निचर, स्टेनलेसच्या विविध किचनमध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू, लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी व व्हेंटिंगमध्ये विविध डिशेस उपलब्ध आहेत. एकाच ठिकाणी अनेक वस्तू उपलब्ध झाल्याने आणि दर माफक असल्याने यात मनसोक्त खरेदी करता येऊ शकते आणि रत्नागिरीकर या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद देतील, असा विश्वास मोहाडीकर यांनी व्यक्त केला.

Mumbai: महाराष्ट्रात टॅक्सी-ऑटो चालकांना मराठी बोलणे अनिवार्य! प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा; प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचे आदेश

अखेर भूषण प्रधानची स्वप्नसुंदरी समोर आलीच! कोण आहे ती? खास पोस्ट करत दाखवला चेहरा

Danoli Village Shutdown Protest : “भरतेशला न्याय मिळालाच पाहिजे”, दानोळी गाव बेमुदत बंद; जिवाभावाचा भरतेश गेला भविष्य सुरक्षितेसाठी गाव एकवटलं

छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना घुमणार... ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित!

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT