कोकण

मद्यधुंद चालकांमुळे आंबोलीत धोका

CD

37550

मद्यधुंद चालकांमुळे आंबोलीत धोका

घाटात अपघातांचे सत्र; ठोस उपाययोजण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली घाटात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या वाहनधारकांमुळे हे प्रकार होत असून, दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघातात एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर घाटातून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि चालकाची कडक तपासणी करावी, अशी मागणी गेळे गावचे सरपंच तथा भाजपचे युवा नेते सागर ढोकरे यांनी आज पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
काही दिवसांपूर्वी घाटात झालेल्या अपघातात एका निष्पाप चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही चालक मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहने चालवतात, ज्यामुळे स्वतःसोबतच इतर प्रवाशांचाही जीव धोक्यात येतो. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत ढोकरे यांनी प्रशासकीय सुस्तपणावर नाराजी व्यक्त केली आहे.
येत्या काही दिवसांत कोकणात पावसाळा सुरू होणार असून आंबोलीत ‘वर्षा पर्यटनासाठी’ पर्यटकांची मोठी गर्दी होणार आहे. पावसाळ्यात घाटात धुके आणि निसरड्या रस्त्यांमुळे अपघाताचा धोका दुप्पट होतो. त्यातच मद्यधुंद चालकांमुळे परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी येथे कायमस्वरूपी चोख नियोजन करावे, अशी मागणी आहे.
------
कोट
37515
आंबोली घाटातील रस्ते अरुंद आहेत. नियमानुसार या मार्गावरून अवजड वाहतुकीला परवानगी नसतानाही अनेकदा मोठी वाहने या मार्गाचा वापर करतात. तसेच, वाहनधारक भरधाव वेगाने गाड्या चालवतात. पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच हे प्रकार वाढले आहेत. पोलिसांनी तात्काळ दखल घेतली नाही आणि कडक उपाययोजना केल्या नाहीत, तर पावसाळ्यात अपघातांची मालिका अधिक भीषण होण्याची शक्यता आहे.
- सागर ढोकरे, सरपंच, गेळे
-----------------------
अशा आहेत मागण्या
- आंबोली घाटाच्या सुरुवातीला, शेवटी वाहनचालकांची ‘ब्रीथ ॲनालायझर’द्वारे तपासणी करा
- मद्यपि चालकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई करा
- घाटातील वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्ही किंवा फिरत्या पथकाद्वारे लक्ष ठेवा
- अरुंद वळणांवर होणारी बेकायदेशीर अवजड वाहतूक तातडीने रोखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT