कोकण

बॅ. खर्डेकरच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

CD

37547

बॅ. खर्डेकरच्या विद्यार्थ्यांची
नामांकित कंपनीमध्ये निवड

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १५ ः नुकत्याच वेंगुर्ले येथे घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना गोवा येथील एस्टीम इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, रसायनशास्त्र विभाग आणि करिअर मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सेल या विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले होते. यामध्ये १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एस्टिम इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रमुख विजय नाईक, अरुण पेठे, प्रशांत मायापूर आणि संतोष शेटकर यांनी विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतला. कंपनीत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व हे शिकण्याची जिद्द, तांत्रिक आणि सॉफ्ट स्किल्स यांचा समतोल, अनुकूलन क्षमता आणि व्यावसायिक शिस्तीने बनलेले असते, असे विजय नाईक यांनी सांगितले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन मंजिरी मोरे-देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रा. धनराज गोस्वामी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. तसेच संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, प्रा. संजय चमणकर, प्रा. सुदाम माने आदींनी त्यांचे अभिनंदन केले. प्रा. प्रभू यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. एच. माने यांनी आभार मानले.
...................
37548

निरामय विकास संस्थेतर्फे
दाभोली प्रशाळेला टॅब भेट
वेंगुर्ले, ता. १५ ः दाभोली इंग्लिश स्कूलला सावंतवाडी येथील निरामय विकास संस्थेतर्फे चार शैक्षणिक टॅबचे वितरण करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्ष डॉ. अनघा सबनीस, उपाध्यक्ष सुधा सबनीस, सचिव वंदना करंबळेकर, आसावरी बर्वे, अस्मिता सबनीस, पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष आत्माराम खानोलकर, मुख्याध्यापक किशोर सोन्सूरकर, रेश्मा चोडणकर, वसंत पवार आदी उपस्थित होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली आणि जूनपर्यंत आणखी तीन टॅब देण्याचे जाहीर केले. या दातृत्वाबद्दल स्कूलतर्फे निरामय संस्थेचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT