कोकण

रत्नागिरी- दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत करण्याच्या हालचाल

CD

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत करण्याच्या हालचाली
रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद; ठोस निर्णयाची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः कोकणशी जोडणाऱ्या दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडीबाबत पुन्हा हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या दिवा स्थानकावरून सुटणारी ही गाडी पूर्वीप्रमाणे दादरहून चालवावी, या मागणीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या संदर्भात तांत्रिक बाबींची तपासणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगिल्यामुळे कोकणवासियांना दिलासा मिळला आहे.
मध्य व पश्चिम उपनगरातील प्रवाशांकडून या गाडीबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दिवा टर्मिनलवरून गाडी सुटत असल्याने मुंबईतील प्रवाशांना अतिरिक्त प्रवास करावा लागत असून, वेळ व खर्च दोन्ही वाढत आहेत. त्यामुळे ही गाडी दादरहून सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. रेल्वेमंत्र्यांच्या भूमिकेमुळे प्रवाशांच्या अपेक्षा उंचावल्या असल्या तरी तत्काळ निर्णय न घेतल्याने प्रवासी संघटनांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. केवळ आश्वासनांवर विषय पुढे ढकलला जात असल्याची भावना काही संघटनांनी व्यक्त केली आहे.
दादर-रत्नागिरी गाडी पूर्ववत करणे अवघड नसल्याचे मत कोकणातील संघटनांनी व्यक्त केले आहे. अन्य मार्गांवरील गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध होत असताना, कोकणात जाणाऱ्या गाड्यांना मुंबईबाहेरूनच सुरू ठेवण्याचे कारण स्पष्ट होत नाही, अशी टीका करण्यात येत आहे. काही पर्यायी मार्ग सुचवून मूळ मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

कोट
दिवा जंक्शन येथे योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध केल्यास गाड्यांचे नियोजन सुलभ होऊ शकते. इतर गाड्यांना दादर किंवा सीएसएमटी येथे स्थान मिळत असताना, कोकणातील प्रवाशांना मात्र गैरसोय का, हा प्रश्न आहे. प्रवाशांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये.
- जयवंत दरेकर, कोकण विकास समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT