डीबीजेच्या विद्यार्थ्यांची कंपनीत निवड
चिपळूण : येथील डीबीजे (स्वायत्त) महाविद्यालयातील रोजगार व प्लेसमेंट सेलतर्फे पाच विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्यात साहिल नलावडे, मरवान दलवाई, मयुरेश सावंत, शर्वरी नलावडे आणि सफा पेवेकर या पाच विद्यार्थ्यांची विविध पदांसाठी निवड झाली आहे. महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि विविध प्लेसमेंटची संधी उपलब्ध करून दिली जाते. या पाच विद्यार्थ्यांची नावे अंतिम यादीमध्ये आली आहेत. या विद्यार्थ्यांना लवकरच कंपनीकडून मुलाखतीकरिता बोलावण्यात येणार आहे.
-----
वाल्मिकीनगर जेटी, रस्ता दुरूस्तीला प्रारंभ
मंडणगड ः राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत वाल्मिकीनगर येथे जेटी दुरूस्ती तसेच जेटीस जोडणाऱ्या रस्ताकामाचे भूमीपूजन करण्यात आले. महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत या कामासाठी ३ कोटी ४१ लाख ८५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामामुळे परिसरातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. या प्रकल्पासाठी गृहराज्यमंत्री कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. जेटी व रस्त्याची दुरूस्ती झाल्यानंतर स्थानिक वाहतूक आणि दळणवळण अधिक सुलभ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, प्रणाली चिले, दीपक मालुसरे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.