कोकण

विचित्र अपघातात वाहनांचे नुकसान

CD

37597

विचित्र अपघातात वाहनांचे नुकसान

कोलगावातील घटना; ट्रकची बस, डंपरला धडक

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः बेळगाव-सावंतवाडी रस्त्यावर कोलगाव येथे चिरा दगडाने भरलेल्या अवजड ट्रकने दिलेल्या धडकेमुळे बस आणि डंपरचा अपघात झाला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी, आंबेगाव-सावंतवाडी ही बस सावंतवाडी बसस्थानकाकडे येत होती, तर चिरे भरलेला डंपर (एमएच १२ केपी १४०३) हा माडखोलच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. सुमारे ७०० चिरे भरून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या अवजड एल. पी. ट्रकवरील (केए ४७ ७७०२) चालकाचा ताबा सुटल्याने या दोन्ही वाहनांवर आदळला. प्रथम बसला आणि त्यानंतर डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात बसच्या दर्शनी भागाचे आणि डंपरच्या मागील बाजूचे मोठे नुकसान झाले.
​अपघाताची माहिती मिळताच कोलगावचे बीट हवालदार मनोज राऊत आणि सुरेश राऊळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. या मार्गावरून रोज मोठ्या प्रमाणात चिरे वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक होत असते. मात्र, या गाड्यांवर संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. प्रशासनाने या अवजड वाहनांवर कायदेशीर कारवाई करून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

RTO Employee Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचे अस्त्र; 'या' तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय, कारण काय?

Mumbai Crime: कांदिवली मेट्रो स्थानकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लिफ्टमध्ये धक्कादायक प्रकार, एकटीला गाठून केलं विचित्र कृत्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

SCROLL FOR NEXT