आठ ग्रामपंचायतींतील
९ जागा राहणार रिक्त
लांज्यात २४ जागांसाठी २३ अर्ज दाखल : २८ एप्रिलला मतदान
लांजा, ता. १५ ः तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमधील २३ ग्रामपंचायत सदस्य आणि १ सरपंचपद अशा एकूण २४ जागांसाठी एकूण २३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. हे सर्व अर्ज छाननीमध्ये वैध ठरले आहेत. १३ ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायतींच्या ९ जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे या जागा पुन्हा एकदा रिक्त राहणार आहेत.
तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या २३ ग्रामपंचायत सदस्य आणि एका सरपंचपदाच्या जागेसाठी २८ एप्रिलला निवडणूक होणार आहे. २९ एप्रिलला निकाल जाहीर होईल. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १३ एप्रिलला भडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले. तसेच याच ग्रामपंचायतीच्या चार सदस्यपदासाठी एकूण ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्या पाठोपाठ शिरवलीतील पाच जागांसाठी ४ अर्ज दाखल झाले.
कोर्ले ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी दोन, आगवे आणि वेरळ या ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी एका जागेसाठी दोन अर्ज दाखल झाले. ते सर्व अर्ज छाननीमध्ये वैध ठरले आहेत. कुरचुंब, वाघ्रट, खावडी, कोट, बेनीबुद्रुक, कोचरी, वेरवली खुर्द या आठ ग्रामपंचायतीमधील ९ जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे या सर्व जागा पुन्हा एकदा रिक्त राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.