सीबीएसई दहावी परीक्षेत
नवनिर्माण हायस्कूलचे यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन’र (CBSE) बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. परीक्षेत नेमिचंद जांगिड याने विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. सृष्टी कोकरेने द्वितीय तर वेदिका आरभावे हिने तृतीय क्रमांक मिळवला. दहावी परीक्षेत नवनिर्माणच्या अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयात ९९ आणि मराठीत १०० पैकी १०० गुण मिळवले असून, इतर सर्व विषयांत ९० पेक्षा जास्त गुण मिळवून प्रावीण्य श्रेणी प्राप्त केली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना समन्वयिका सीमा हेगशेट्ये, अलमास लांबे, तबस्सुम खान, सोनाली मसुरकर, मुफर्रा काझी, काव्या शिर्के आणि गीतांजली सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.