आंबोलीत २३ पासून
पतसंस्थांचे अधिवेशन
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जिल्हास्तरीय दोन दिवसांचे पतसंस्थांचे अधिवेशन तील आंबोली येथे २३ व २४ मे रोजी होत आहे. जिल्ह्यातील पतसंस्थांनी अधिक उभारी घ्यावी, भविष्यातील आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जावे, हा अधिवेशनाचा उद्देश आहे. अधिवेशनाच्या खर्चासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५०,००० रुपयांची देणगी जाहीर केली आहे. याबाबतची माहिती पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ अधिक प्रभावशाली होणे ही काळाची गरज आहे. पतसंस्थांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असून, यासाठी भविष्यातही बँकेकडून सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष व फेडरेशनचे संचालक बाबुराव कविटकर, सचिव महेश्वर कुंभार उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या सहकार्याबद्दल फेडरेशनचे अध्यक्ष श्री. राऊळ यांनी आभार व्यक्त केले. या उपक्रमाला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (सिंधुदुर्ग) यांचेही सहकार्य मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
...................
मळगाव दत्त मंदिराचा
गुरुवारी वर्धापन सोहळा
सावंतवाडी ः मळगाव येथील स्वयंभू औदुंबर दत्त मंदिराचा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी (ता. २३) उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता श्रींच्या चरणांवर अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर ९ ते ११ या वेळेत श्रीदत्त भक्तांसाठी अभिषेक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुपारी १२ वाजता श्रींची आरती, १ वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सायंकाळच्या सत्रात स्थानिक कलाकारांचा ''भक्तिरंग'' हा विशेष कार्यक्रम सादर होणार असून, त्यानंतर स्थानिक भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. मळगाव परिसरातील सर्व भाविकांनी या मंगलमयी सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खानोलकर कुटुंबीय आणि श्री दत्तप्रसाद भजन मंडळ, रस्तावाडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
.....................
सावंतवाडीत २७ पासून
''नित्यचैतन्य'' शिबिर
सावंतवाडी ः तालुक्यातील मुलांसाठी उन्हाळी सुटीत इस्कॉन, सावंतवाडीच्या वतीने ''नित्यचैतन्य समर कॅम्प''चे आयोजन करण्यात आले आहे. मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणे, त्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देणे हा यामागचा उद्देश आहे. या शिबिरात यामध्ये प्रामुख्याने श्लोक पठण व कथा, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगासने, शारीरिक चपळतेसाठी जुन्या पारंपरिक खेळ, हस्तकला (क्राफ्ट) यांचा समावेश आहे. सहभागी मुलांसाठी दररोज स्वादिष्ट कृष्णप्रसादाची विशेष व्यवस्था केली आहे. हे शिबिर २७ एप्रिल ते १ मे या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भटवाडी येथील हरे कृष्ण सत्संग केंद्रामध्ये संपन्न होणार आहे. शिबिर ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी खुले आहे. याव्यतिरिक्त इस्कॉनतर्फे दर रविवारी सकाळी ११ ते १ या वेळेत मुलांसाठी मोफत ''बाल संस्कार'' वर्ग आणि पालकांसाठी विशेष सत्संग आयोजित केला जातो. पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.