कोकण

व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजमध्ये रक्तदान शिबिराला प्रतिसाद

CD

swt161.jpg
37709
कुडाळ : रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा सन्मान करताना प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग.

व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजमध्ये
रक्तदान शिबिराला प्रतिसाद
सामाजिक बांधिलकी : संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ : जागतिक आरोग्य दिन आणि संस्थेचा वर्धापन दिन यानिमित्त येथील व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर झाले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
या रक्तदान शिबिराचे आयोजन व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज च्या प्राचार्या डॉ. शिल्पा मर्गज तसेच संस्थेचे चेअरमन व्हिक्टर डांटस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरासाठी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथील डॉक्टरांचे सहकार्य लाभले. त्यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत नियमित रक्तदानाची गरज व्यक्त केली. या शिबिरात विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. आरोग्य तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सर्व प्रक्रिया सुरक्षितरीत्या पार पडली. रक्तदान करणाऱ्या दात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रक्तदान करणाऱ्यांमध्ये लॉ कॉलेजचे विद्यार्थी रवींद्र गुरव, अमेय जोशी, उज्वल गावडे, राज शिवगण, सर्वेश खोत, हर्ष मळेकर, रुपेश आळवे, ध्रुवा नेमळेकर, प्राध्यापक संग्राम गावडे यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी सुयश वऱ्हाडकर, तुषार गावडे, मिताली सतेजी, पूजा राठोड, आफ्रिन शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन व आभार प्रणिता परब यांनी मानले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व मानवतेची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Passport Fees: परदेश प्रवासाचे स्वप्न महागणार! केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्क वाढवले; किती आणि कधीपासून नवे दर लागू होणार?

IND vs IRE : वैभव सूर्यवंशीचे भारताच्या सीनियर खेळाडूंसोबत पहिले सराव सत्र कसे राहिले? मैदानावर जाताना नेमकं काय घडले? Video

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT