swt162.jpg
O37712
सुनील पवार
ऐतिहासिक गड-किल्ल्यांवरील
निंदनीय प्रकार त्वरित रोखा
सुनील पवार ः ...अन्यथा आंदोलन उभारू
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ ः गड-किल्ले हे पर्यटन स्थळ नसून, ते आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची साक्ष देणारी पवित्र स्थळे आहेत. या ठिकाणी निंदनीय आणि असंवेदनशील घडणाऱ्या घटनांना तत्काळ आळा न घातल्यास कठोर आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी दिला आहे.
श्री. पवार यांनी म्हटले आहे की, रायगड किल्ला हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी व पवित्र ऐतिहासिक स्थळ आहे. याच ठिकाणी शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांचे समाधी मंदिरही त्याच ठिकाणी आहे. त्यामुळे रायगडाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा पवित्र ठिकाणी काही दिवसांपूर्वी प्री-वेडिंग शूटिंग झाल्याची घटना समोर आली आहे, जी अत्यंत निंदनीय आणि असंवेदनशील आहे. गड-किल्ले हे पर्यटन स्थळ नसून, ते आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची साक्ष देणारी पवित्र स्थळे आहेत. नियमांनुसार परवानगीशिवाय अशा प्रकारचे छायाचित्रण करणे हा गुन्हा आहे. तरुणांनी इतिहासाचा आदर ठेवून वर्तन करावे. गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखणे ही आपली जबाबदारी आहे. अशा घटनांना आळा घालणे अत्यावश्यक आहे, अन्यथा भविष्यात कठोर आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा श्री. पवार यांनी देत गड-किल्ले जपा, इतिहास जपा, असे आवाहनही केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.