कोकण

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

CD

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क
अक्षय तृतीयेचा मुहूर्त : उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ : अक्षय तृतीया दिवशी होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे. बालविवाह करणाऱ्यांची गय केली जाणार नाही व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिला असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बापू शिणगारे यांनी दिली.
बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मध्ये कलम १६ (१) नुसार ग्रामीण भागातील ग्रामसेवक शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्त्वाची व सामाजिक क्रिया आहे. साहजिकच शुभमुहूर्तावर विवाह विधी केले जातात. अक्षतृतीयेच्या शुभमुहूर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. त्या अनुषंगाने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
बालविवाहात सहभागी होणारे व सहकार्य करणारे व्यक्ती ,धार्मिक गुरु, पंडित, सेवा देणारे व्यावसायिक, मंडप मालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यवसायिक आणि वाजंत्री यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते. त्यामुळे सेवा देताना मुलगी १८ वर्षे पूर्ण व मुलगा २१ वर्ष पुर्ण असल्याची खात्री करण्यात यावी. नागरिकांनी बालविवाह रोखण्यासाठी हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक १०९८ किंवा ११२ वर माहिती द्यावी. नागरिकांनी सतर्क राहून बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा माहिती व बालविकास अधिकारी बापू शिणगारे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Goa flight: सोलापूर-गोवा विमानसेवा हाऊसफुल; वर्षभरात १४ हजार प्रवासी, तिकीटदर १२ हजारांवर

Latest Marathi News Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकासाचा मुद्दा पटल्यास भाजपात प्रवेश करेन- संजय राऊत

अल्फाच्या सेटवर आलियाच बॉबी देओलसोबत खरंच भांडण झालेलं? अभिनेता खुलासा करत म्हणाला....'त्यावेळी अनेक गोष्टींकडे मी...'

US Iran war : युद्ध पुन्हा भडकले ! शस्त्रसंधी सुरु असतानाच अमेरिकेचा हल्ला, इराणचाही प्रतिहल्ला; कुवेत ठरलं रणांगण

French Open 2026: चार वेळच्या चॅम्पियनला वाढदिवशीच धक्का! इगा स्विअतेकचा फ्रेंच ओपनमधून अनपेक्षित पॅकअप

SCROLL FOR NEXT