कोकण

रत्नागिरीत उन्हाचा तडाखा

CD

-rat१६p१३.jpg-
26O37743
रत्नागिरी ः उन्हाच्या कडाक्यापासून थोडे संरक्षण व्हावे म्हणून जयस्तंभ येथून डोक्यावर पिशवी घेऊन जाताना एक ज्येष्ठ नागरिक.
----
उन्हाच्या झळांनी रत्नागिरीकर हैराण
सतर्कतेच्या सूचना; लिंबू, कलिंगडाची मागणी वाढली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचा पारा चढू लागला असून, वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा कडक ऊन आणि रात्री वाढत्या उकाड्यामुळे रत्नागिरीकरांची लाहीलाही होत असून, भारतीय हवामान खात्याने किनारपट्टीच्या जिल्ह्यांसाठी ‘हीटवेव्ह’रचा (उष्णतेची लाट) इशारा दिला आहे.
विदर्भात तापमान ४५ अंशांच्या उंबरठ्यावर असले, तरी कोकणातील हवेत असलेल्या आर्द्रतेमुळे जाणवणारा उकाडा रत्नागिरीकरांना अधिकच त्रस्त करत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे हवेतील ओलावा कमी झाल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रत्नागिरीसह मुंबई, ठाणे आणि पालघर या पट्ट्यातही उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. वाढत्या तापमानापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक आता रसवंती गृहे, ताक आणि लस्सीच्या दुकानांकडे वळले आहेत. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी कलिंगड आणि लिंबू सरबतासारख्या थंड पदार्थांना मोठी मागणी आहे.
हवामान विभागाने १८ आणि १९ एप्रिलच्या सुमारास राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. प्रशासनाकडून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
---
नागरिकांनी हे टाळावे
* सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत विनाकारण घराबाहेर जाणे
* दिवसातून जास्तीत जास्त पाणी प्यावे
* घरगुती लिंबू सरबत किंवा ताकाचे सेवन करावे.
* बाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा
* शक्यतो सुती व सैल कपडे परिधान करावेत.
---
गेल्या आठवडाभरातील तापमानाची नोंद
तारीख* किमान* कमाल
११ एप्रिल* १५.६* ३३.३
१२ एप्रिल* १७.३* ३४.७
१३ एप्रिल* १७.८* ३४.५
१४ एप्रिल* २४ * ३५
१५ एप्रिल* २५* ३५
१६ एप्रिल* २५* ३६
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

SCROLL FOR NEXT