- ratchl१६३.jpg-
26O37765
चिपळूण ः डेरवण राजेवाडी धरणाची पाहणी करताना आमदार शेखर निकम.
-----
राजेवाडी धरण दुरुस्ती अंतिम टप्प्यात
आमदार निकम यांच्याकडून पाहणी; ४० गावांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः तालुक्यातील डेरवण राजेवाडी धरण दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात या धरणात ४० टक्के पाणीसाठा केला जाणार आहे. पुढील वर्षी धरणावर अवलंबून असलेल्या सुमारे ४० गावांत पाणीटंचाईची समस्या जाणवणार नाही, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला.
डेरवण-राजेवाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी आमदार शेखर निकम यांनी १४ कोटी ९९ लाखाचा निधी मंजूर केला होता. दोन वर्षापासून या धरणाची दुरुस्ती सुरू आहे. बुधवारी आमदार शेखर निकम, चिपळूण जलसंधारण विभागाचे उपअभियंता सागर भराडे, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, सदस्य संजय कदम यांच्यासह ग्रामस्थांसह धरण दुरुस्ती कामाची पाहणी केली. आमदार शेखर निकम यांनी उपअभियंता भराडे व संबंधित अधिकारी यांच्याकडून धरणाच्या दुरुस्तीची स्थिती जाणून घेतली. धरणाचे काम जलदगतीने प्रगतिपथावर चालू असून, धरणाचे मातीकाम २० मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल. तसेच गेट वॉल्व बसवण्याचे कामही मे अखेर पूर्ण होण्याचा अंदाज आहे. शिवाय यावर्षी साधारण ४० टक्के पाणीसाठा धरणात साठेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मागील काही वर्षांपासून धरणाच्या गळतीमुळे जवळपास ४० गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुढील वर्षी २०२७ पर्यंत धरणाचे काम पूर्ण करून मुबलक पाणीसाठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. पुढील पावसाळ्यात धरणात दगडी पिचिंगचे काम झाल्यावर १०० टक्के पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे कापशी नदीकिनारी असलेल्या सुमारे ४० गावातील पाणीटंचाई संपुष्टात येईल, असा विश्वास आमदार निकम यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.