कोकण

पाचरळ शाळेला ११ हजारांची देणगी

CD

-rat१६p५.jpg ः
26O37700
पाचरळ: मुख्याध्यापकांकडे धनादेश सुपूर्द करताना स्नेहा घोसाळकर व मान्यवर.

पाचरळ शाळेला ११ हजारांची देणगी
मंडणगड ः पाचरळ येथील जिल्हा परिषद मराठी शाळेस स्नेहा घोसाळकर यांनी ११ हजार रुपयांची देणगी दिली. एसआरपीचे निवृत्त अधिकारी (कै.) अनिल घोसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. या निधीचा वापर शाळेच्या शैक्षणिक व भौतिक सुविधांच्या विकासासाठी करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले. १६ एप्रिलला आयोजित कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माधवी शिंदे, उपाध्यक्षा प्रज्ञा बर्जे, सदस्य अरुण घोसाळकर, ज्येष्ठ ग्रामस्थ रंजन घोसाळकर, शिर्के, मुख्याध्यापक करावडे, शिक्षक हुंबरे, सोनावणे, जाधव व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी घोसाळकर यांनी घोसाळकर कुटुंबाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.


लांजात आज समाधान शिबिर
लांजा ः महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत लांजा तालुक्यातील व्हेळ क्र. १ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत शुक्रवारी (ता. १७) सकाळी १०.३० वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महसूल मंडळ स्तरावरील एकदिवसीय शिबिराचे उद्‍घाटन आमदार किरण सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी जिल्हा परिषद सदस्य विनिता गांगण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, सदस्य लीला मोहन घडशी, तसेच पंचायत समिती सदस्य शैलेश खामकर आणि रसिका मेस्त्री हे उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

SCROLL FOR NEXT