मंडणगड-नांदेड
एसटीची फेरी सुरू
मंडणगड ः मंडणगड आगाराची दापोली-खेड-चिपळूणमार्गे नांदेड अशी नवीन एसटी बससेवा १५ एप्रिलला सुरू करण्यात आली. या नव्या फेरीमुळे कोकणातून मराठवाड्याकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही बस मंडणगड बसस्थानकातून दररोज पहाटे ४.३० वा. नांदेडकडे रवाना होणार असून, नांदेडहून सकाळी ४ वा. मंडणगडकडे येणार आहे. या वेळी मंडणगड तसेच दापोली बसस्थानकात बसचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, दापोली आगार व्यवस्थापक राजेंद्र उबाळे, एसटी प्रवासीमित्र संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर, खजिनदार आसिफ खलपे, मंगेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील, कार्यशाळा अधीक्षक मुनाफ राजापकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.