-rat१६p१६.jpg-
26O37787
राजापूर ः शीळ येथे आयोजित आढावा बैठकीत बोलताना नगरसेवक जमीर खलिफे. शेजारी अभिजित गुरव, नंदिनी कदम, आमदार किरण सामंत आदी.
---------
समांतर जलवाहिनीचा मार्ग मोकळा
शीळ जॅकवेल काम ; ग्रामस्थांसोबत चर्चा सफल
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ जॅकवेलला समांतर जलवाहिनीच्या कामासंदर्भात नगरपालिकेच्या शिष्टमंडळासमवेत आमदार किरण सामंत यांनी आढावा बैठक घेतली. जॅकवेल व जलवाहिनी कामात येणाऱ्या अडचणी, स्थानिक पातळीवरील अडथळे तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या यावर सखोल चर्चा करण्यात आली. त्यानंतर शीळ जॅकवेल समांतर जलवाहिनी कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
शीळ येथील ज्ञानसादरह वाचनालय येथे झालेल्या या बैठकीला तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजित गुरव, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कुवळेकर, माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे, पाणीपुरवठा समिती सभापती सौरभ खडपे, सरपंच अशोक पेडणेकर, मुख्याधिकारी अभिजित कुंभार, शीळ वाचनालयाचे अध्यक्ष गोपाळ गोंडाळ आदी उपस्थित होते.
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या कामामुळे नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत आमदार सामंत यांनी संबंधित सर्व घटकांना एकत्र आणून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये यश आले आहे. शीळ धरण प्रकल्प, अंतर्गत रस्ते यांसह अन्य विकासकामांसंदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. स्थानिक ग्रामस्थांनी मांडलेल्या अडचणींचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सामंत यांनी अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.