कोकण

तांत्रिक कारणास्तव कम्युनिटी सेंटर; पण होणार बुद्धविहारच

CD

बुद्धविहारावरून दिशाभूल थांबवा
मारुती कांबळे ः निधीसाठी ‘कम्युनिटी सेंटर’चा वापर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परिसरातील जागेवर केवळ आणि केवळ भव्य बुद्धविहारच साकारले जाणार आहे. काही समाजबांधव तांत्रिक शब्दांचा आधार घेऊन जाणीवपूर्वक नागरिकांची दिशाभूल करत आहेत. तांत्रिक कारणास्तव ‘कम्युनिटी सेंटर’ शब्दाचा वापर केला आहे. ही ऐतिहासिक वास्तू समाजाच्या अस्मितेचे प्रतीक ठरणार असून, तिचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी ट्रस्टची आहे, अशी स्पष्ट भूमिका बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष मारुती कांबळे यांनी मांडली.
शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, सुहास कांबळे, कायदेशीर सल्लागार शिवराज जाधव, कोषाध्यक्ष प्रीतम अहिरे यांच्यासह शशिकांत कांबळे आदी उपस्थित होते. ते म्हणाले, ​थिबा राजाकालीन ऐतिहासिक बुद्धविहार परिसराचा विकास व्हावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून समाजबांधवांकडून केली जात होती. यासाठी स्थापन झालेल्या ‘थिबा राजाकालीन बुद्धविहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्ट’ने सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश मिळून पालकमंत्री उदय सामंत आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या सहकार्याने १७.५० गुंठे शासकीय जमीन बुद्धविहारासाठी मंजूर करण्यात आली.
या कामासाठी शासकीय निधीची तरतूद करताना एक तांत्रिक अडचण निर्माण झाली. शासकीय नियमांनुसार ‘बुद्धविहार’ या नावाने थेट निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद नसल्याने, प्रशासकीय स्तरावर तो निधी ‘कम्युनिटी सेंटर’ या शीर्षकाखाली मंजूर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विधेयक राष्ट्रविरोधी, सत्ता मिळवण्याचा प्रयत्न - राहुल गांधींचा हल्लाबोल

फक्त 50 रुपये दंड ! प्राण्यांविरुद्धच्या अत्याचारांवर अभिनेत्री पूजा सावंत व्यक्त "मी पोलीस ऑफिसर असते तर"

Bhooth Bangla X Review: कसा आहे अक्षय कुमारचा 'भूत बंगला'? ट्विटरवर लोकांनी कुंडली मांडली, म्हणाले- हे तर...

Walmik Karad Video: अजूनही पायात चप्पल नाही... वर्षभरानंतर वाल्मिक कराडचा व्हिडीओ आला; प्रकृती बिघडली

'स्वामींची कृपा असेल की, मी तिला...' थोडक्यात वाचली होती क्रांती रेडकर, केदार शिंदे जत्रा सिनेमाचा प्रसंग सांगताना म्हणाले...

SCROLL FOR NEXT