कोकण

प्रसुतीसाठी खासगी रुग्णालयांकडे पाठवणाऱ्यांवर कारवाई

CD

जिल्हा रुग्णालयाच्या सेवांना गती
प्रसुती वळवणाऱ्यांवर कडक पावले; भरारी पथकाची तयारी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः जिल्हा शासकीय रुग्णालयात गुढघारोपणसारख्या यशस्वी शस्त्रक्रिया होत आहेत, ही कौतुकाची बाब आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा रुग्णालयाला फायदा झाला असून, १४५ डॉक्टर्स काम करत आहेत. २ कार्डियाक आणि १२ सर्वसाधारण रुग्णवाहिकांचा प्रस्ताव द्या, असे सांगतानाच प्राथमिक आरोग्यकेंद्रातून जाणीवपूर्वक खासगी रुग्णालयाकडे प्रसुतीसाठी पाठवणाऱ्यांवर कडक कारवाई करा, त्यासाठी भरारी पथक ठेवा, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. जिल्हा शासकीय रुग्णालयात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी बुधवारी (ता. १५) आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालय (सनियंत्रण व सल्लागार) समिती सदस्य, जि. प. सदस्य हर्षदा गावडे, श्रद्धा मोरे, नगरसेवक अभिजित दुडे, सुहेल मुकादम, बंड्या साळवी, सागर भिंगारे, संपदा तळेकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले, समिती सदस्यांनी रुग्णांशी बोलून त्यांच्या अडीअडचणी समजून त्या जिल्हा शल्यचिकित्सकांना सांगितल्या पाहिजेत. महिन्यातून एकदा बैठक घेतली पाहिजे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वेळेत असतात का? रुग्णांच्या अडचणी, रुग्णांसाठीच्या सुविधा या विषयीदेखील समिती सदस्यांनी देखरेख केली पाहिजे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jewellers Strategy Gold: सोने विक्रमी उच्चांकावर असताना सराफ “विक्री करा” ऐवजी “आणखी खरेदी करा” असे का सांगतात?

MSRTC कडून एसटी बस दरात मोठी वाढ! प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त चार्जही लागू; किती आणि का?

YouTube Shorts पाहण्याचं व्यसन लागलंय? मिनिटात मिळेल सुटका; गुगलकडून '0 Minute' चा पर्याय..हे नेमकं कसं वापरायचं पाहा

Loni Kalbhor News : कोचिंग क्लासला गेलेली १४ वर्षीय मुलगी बेपत्ता; भावाचे लक्ष नसल्याची संधी साधून पळवून नेल्याचा संशय

Melbourne Vasai Easter Fest: मेलबर्नमध्ये वसईची परंपरा कायम: २१ वर्षांपासून इस्टर मेळाव्यात लोकसंगीत, नृत्य, खाद्यसंस्कृतीचा जल्लोष

SCROLL FOR NEXT