लग्नाला गेलेल्या तरुणाचा मृत्यू
मनोर, ता. १६ ः मित्राच्या लग्नाला गेलेल्या तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळांवर आढळला होता. या प्रकरणात पालघर रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पण कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे.
वाकसई गावातील आतेश प्रकाश भोईर (वय२८) त्याच्या मित्राच्या हळदी समारंभासाठी शनिवारी रात्री मायखोप गावातील पाटील पाडा येथे गेला होता. उशीरा रात्रीपर्यंत घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला होता. रेल्वे पोलिसांना त्याचा मृतदेह केळवा रोड स्टेशन लगत रेल्वे रुळावर आढळून आला. आतेशच्या कुटुंबीयांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. तसेच कुटुंबीयांकडून रेल्वे पोलिसाकडे घटनेच्या चौकशीचा मागणी करण्यात आली आहे. आतेश भोईरचे लग्न जमले होते. १९ एप्रिलला त्याचा साखरपुडा होणार होता. तसेच १० मे रोजी लग्नाची तारीख नक्की करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.