पिंगुळी शेटकरवाडी येथे
उद्यापासून विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ : पिंगुळी शेटकरवाडी ग्रामस्थ कला व सांस्कृतिक मंडळ आणि ग्रामस्थांतर्फे शेटकरवाडीचे स्थानदैवत श्री देव महापुरुषाचा वार्षिक उत्सव यंदा तीन दिवस १९ ते २१ एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा होणार आहे.
१९ एप्रिलला सायंकाळी ७.३० वाजता, उद्घाटन समारंभ तसेच शेटकरवाडीतील विविध क्षेत्रातील मान्यवर व जेष्ठांचा सत्कार सोहळा, वाडीतील महिला व मुलींचे समुहनृत्य, व छोट्या मुला-मुलींची वेशभूषा सादरीकरण, २० रोजी सकाळी ८.३० वाजता, श्री देव गणेश पूजन रात्री ८ वाजता नटेश्वर नाट्यमंडळ शेटकरवाडी प्रस्तुत धमाल विनोदी मालवणी नाट्य कलाकृती सोरगत लेखिका : उषा परब दिग्दर्शक : अशोक सर्वेकर व अर्जुन राणे
कलाकार : शेटकरवाडीतील नव्या दमाचे शिलेदार,नेपथ्य, रंमभूषा, संगीत : आमचे आम्हीच, २१ रोजी सकाळी ८.३० वाजता श्री देव गणेश पूजन श्री देव महापुरुष पूजन, श्री देव सत्यनारायण महापूजा महाआरती आणि महानैवेद्य महाप्रसाद सायंकाळी हळदी-कुंकू समारंभ हरिपाठ (सादरकर्ते जीवन विद्यामिशन, पिंगुळी-कुडाळ) ग्रामस्थांची सुस्वर भजने रात्री ८ वाजता लकी ड्रॉ लॉटरीची सोडत. ९ वाजता श्री सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ दोडामार्ग प्रस्तुत महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग ‘सत्वशील राजा हरिश्चंद्र- तारामती’ या एकाच नाटकात २० भूमिका अभिनय, संगीत, विनोदाची मेजवानी असणारा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.