कोकण

तेंडोली रवळनाथ पंचायतनचा उद्यापासून वर्धापन सोहळा

CD

swt178.jpg
37942
श्री देव रवळनाथ

तेंडोली रवळनाथ पंचायतनचा
उद्यापासून वर्धापन सोहळा
कुडाळ, ता. १७ : तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन सोहळा १९ ते २५ एप्रिल याकालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
१९ रोजी सकाळी ७ वाजता देवतावंदन, पुण्याहवाचन, अग्नीस्थापन, ग्रहयज्ञ, ऋग्वेद शाकल संहिता स्वाहाकारारंभ, ७.३० वाजता श्री देव रवळनाथ चरणी दररोज ऋग्वेदसंहिता अभिषेक पूजा, यज्ञमंडप वास्तुयजन, गणपती लघुरुद्र, दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी ५ वाजता किर्तनकार- स्नेहलदीप सामंत यांचे कीर्तन, रात्री ८ वाजता १४ वर्षाखालील वयोगट रेकॉर्ड डान्स, २० रोजी सकाळी ७ वाजता स्थापित देवता पूजन, ७.३० वाजता स्वाहाकार, श्री जगदंबा सातेरी लघुरुद्र, ५ वाजता दिलीप ठाकूर (मालवण) यांचे गायन, ७ वाजता नित्य आरती, रात्री ९ वाजता तेंडोलकर दशावतार मंडळ (झाराप) यांचे नाटक, २१ रोजी सकाळी ७ वाजता स्थापित देवता पूजन, ७.३० वाजता स्वाहाकार, महादेव लघुरुद्र, दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी ४ वाजता तरंगस्वरूप देव नेसवणे-पाषाणे सजवणे, तरंगाना वस्त्रालंकार, रात्री ८ वाजता श्री देव रवळनाथ मंडळा अंतर्गत श्रींची इच्छा कलामंच (तेंडोली) यांचे ‘लावणी भुलली अभंगाला’ संगीत नाटक, २२ रोजी सकाळी ७ वाजता स्थापित देवता पूजन, ७.३० वाजता स्वाहाकार, शिखर कलश विधी, जलाधिवास, शयन, हवन, श्री जगदंबा भद्रकाली लघुरूद्र, दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी ५ वाजता किर्तनकार - मकरंद देसाई (तेंडोली) चे कीर्तन, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, ९ वाजता श्री रवळनाथ द. ना. मंडळ (तेंडोली) यांचे नाटक, २३ रोजी सकाळी ७ वाजता स्थापित देवता पूजन, ७.३० वाजता स्वाहाकार श्री वेताळ लघुरुद्र, ९ वाजता सातेरी मंदिर मांडावर देव तरंग, पालखीसह आगमन होऊन देव संचारासहित कलशारोहण, ९.३० वाजता शिखर कलश प्रतिष्ठा सोहळा श्री लक्ष्मी नरसिंहपीठ, श्री शंकर मङ, गोकर्ण क्षेत्र कुमठा येथील श्रीमद् शंकराचार्य, ब्रहमानंद सरस्वती महाराज यांच्या पवित्र सानिध्यात त्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी ५ वाजता किर्तनकार - राजू मुंडले यांचे किर्तन, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, ९ वाजता शिवप्रेमी मित्रमंडळ (तेंडोली) यांची एकांकिका, कलांकुर ग्रुप (तेंडोली) यांची एकांकिका, कलांकुर ग्रुप आंबेडकर नगर (तेंडोली) यांची एकांकिका, २५ रोजी स्वारिंचे सातेरी मंदिरात मांडावर आगमन संचार होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव रवळनाथ पंचायतन देवसस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती (तेंडोली) आणि सर्व पंचायतनप्रेमी भक्तजन मानकरी, सेवेकरी, बारापाच यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bills : मत मिळवण्याच्या परिक्षेत मोदी सरकार फेल! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर

Illegal Sand Mining: लांजीत पैनगंगा नदीपात्रात ट्रेझर बोट, जेसीबीने अवैध वाळू उत्खनन; सायफळ घाट बंद तरीही प्रशासन मूकदर्शक

Hormuz Strait Reopens : होर्मुझची सामुद्रधुनी खुली होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण, सामान्यांना दिलासा; शेअर बाजारातही उसळी

Akshayy Tritiya 2026 : यंदाच्या अक्षय्य तृतीयेला एक नाही दोन राजयोगांचा धमाका ! 3 राशी होणार अफाट श्रीमंत

मोठी बातमी! LPG वापरकर्त्यांचं संकट संपणार, अखेर होर्मुझची सामुद्रधुनी खुली… इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT