कोकण

मडुरा येथे सत्संग सप्ताह सोहळा

CD

37943

मडुरा येथे सत्संग
सप्ताह सोहळा
​बांदा, ता. १७ : श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज, कनूर यांच्या आज्ञेनुसार मडुरा-बावरवाडी येथील ‘प्रेमकुटीर आश्रम’ येथे ३९ व्या वार्षिकोत्सव सत्संग सप्ताहाचे आयोजन केले आहे. २१ ते २३ एप्रिल या कालावधीत हा सोहळा होणार असून विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ​यानिमित्त रोज पहाटे ५.३० वाजता काकड आरती, ध्यान, सकाळी १० वा. प्रतिमा पूजन होईल. त्यानंतर ‘जीवगुण त्यागाने आनंदाविर्भाव होतो तर आपण जीवगुण का त्यागू नये’ या विषयावर चर्चासत्र, दासबोध व सुलभ आत्मज्ञान ग्रंथ वाचन आणि मान्यवरांची प्रवचने होतील. तसेच सकाळचे भजन व महाप्रसाद होईल. सायंकाळी ७ वा. सुलभ आत्मज्ञान ग्रंथ वाचन, मान्यवरांची प्रवचने, भजन व महाप्रसाद होईल. ​२१ रोजी संध्याकाळी ५ वा. हेब्बाळी येथील श्री समर्थ सद्गुरू दत्तावधूत महाराज यांचे प्रवचन होईल. ​बुधवार २२ रोजी दुपारी ४.३० वा. श्री सद्गुरूंची पालखी मिरवणूक मडुरा तिठा ते प्रेमकुटीर आश्रम अशी काढण्यात येईल. २३ एप्रिल रोजी दुपारी १ ते २ या वेळेत महाप्रसाद व सप्ताहाची सांगता होईल. त्यानंतर रात्री ७ ते ९.३० या वेळेत सत्संग होईल. सर्व साधक, सद्भक्त आणि नागरिकांनी या सत्संग सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मडूरा पंचक्रोशी सद्भक्त मंडळींनी केले आहे.
----------
न्हावेली येथे उद्या
दशावतार नाटक
आरोंदा : न्हावेली (भोमवाडी) येथील श्री देव टेमकरी मंदिर येथे अक्षय्य तृतियानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजत अभिषेक, सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२:३० वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने तसेच रात्री ठिक १० वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोस यांचा ‘दख्खनचा राजा, जोतिबा माझा’ हा ट्रिक्सीनयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे, तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन न्हावेलीवासीयांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

सतत वस्तू हातातून पडणं, चालताना अडखळणं? मुलांमध्ये दिसणारी ही लक्षणं दुर्लक्षित करू नका; असू शकतात मेंदूतील ट्युमरचे संकेत

चिमुकला पाण्यात बुडत होता; वाचवण्यासाठी दोघांची नदीत उडी अन्...; महादेव घाटावरील पिकनिकचा आनंद क्षणात शोकांतिकेत

SCROLL FOR NEXT