कोकण

लांजा ः नगरपालिकेला मिळणार अग्निशमन वाहन

CD

सकाळ बातमीचा परिणाम-------लोगो

लांजा पालिकेला मिळणार अग्निशमन वाहन
प्रशासकीय मान्यता मिळाली; ९० लाख रुपयांचा निधी
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १७ ः नगरपालिकेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी ९० लाख रुपयांच्या निधीला प्रशाकीय मान्यता मिळाली असून, शासनस्तरावरून निविदा प्रक्रियाही राबवण्यात येणार आहे. शहरातील रखडलेला प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
दै. सकाळने लांजा शहरातील अग्निशमन यंत्रणेविषयी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत ही प्रक्रिया वेगाने राबवण्यास सुरवात झाली आहे. अग्रिशमन यंत्रणेसाठी ९० लाखाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामध्ये शासनाचे ८१ लाख आणि नगपंचायतीचे ९ लाख रुपये आहेत. अग्निशमन वाहनासाठी शासनाकडून निविदा काढण्यात येणार आहे. लांजा नगरपंचायतीने पाठवलेल्या प्रस्तावाला वर्षभरापूर्वी मंजुरी मिळाली होती. राज्य अग्निशमन संचालनालयाकडे नगरपंचायतच्यावतीने पाठपुरावा करण्यात आला. यासाठी आमदार सामंत यांनीही पाठपुरावा केल्याचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी सांगितले.
लांजा-कुवे शहर झपाट्याने वाढत आहे. शहरात आगीच्या घटना आधी घडत आहेत. आतापर्यंत आपत्कालीन घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी राजापूर किंवा रत्नागिरी येथून अग्निशमन वाहन मागवावे लागते; मात्र अंतर लांब असल्यामुळे बंब यायला विलंब होत होता. सुरक्षिततेच्यादृष्टीने अग्निशमन वाहन लांजा तालुक्यात असणे अनिवार्य होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bills : मत मिळवण्याच्या परिक्षेत मोदी सरकार फेल! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर

Illegal Sand Mining: लांजीत पैनगंगा नदीपात्रात ट्रेझर बोट, जेसीबीने अवैध वाळू उत्खनन; सायफळ घाट बंद तरीही प्रशासन मूकदर्शक

Hormuz Strait Reopens : होर्मुझची सामुद्रधुनी खुली होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण, सामान्यांना दिलासा; शेअर बाजारातही उसळी

Akshayy Tritiya 2026 : यंदाच्या अक्षय्य तृतीयेला एक नाही दोन राजयोगांचा धमाका ! 3 राशी होणार अफाट श्रीमंत

मोठी बातमी! LPG वापरकर्त्यांचं संकट संपणार, अखेर होर्मुझची सामुद्रधुनी खुली… इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT