कोकण

कोलगाव सातेरी पंचायतन देवस्थानचा पडली उत्सव

CD

कोलगाव सातेरी पंचायतन
देवस्थानचा पडली उत्सव
ओटवणे, ता. १७ ः कोलगावचे ग्रामदैवत देवी सातेरी पंचायतन देवस्थानचा, त्रैवार्षिक पडली उत्सव ७ ते ११ मे या कालावधीत होणार आहे. पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. आयोजकांनी ही महिती दिली.
७ मे रोजी सायंकाळी ४ वाजता कुळघर चंदन धुरी यांच्या घराकडून तरंगकाठीसह वाजत गाजत देवी सातेरी मंदिर येथे प्रस्थान व मुक्काम होईल. ८ रोजी दुपारी २ वाजता देवी सातेरी मंदिराकडून अंधार व तरंगकाठीसह चव्हाटा येथे या देवया भेटीसाठी प्रस्थान व तेथे धार्मिक विधी, मानपान व नवसफेड कार्यक्रम होतील. रात्री ९ वाजता महाप्रसाद व नंतर दिर्बाई देवी मंदिराकडून अंधार व तरंगकाठीसह चव्हाटा मंदिरकडे प्रस्थान व रात्री मुक्काम होईल. ९ मे रोजी सकाळी १० वाजता अंधारांच्या हस्ते धार्मिक विधीयुक्त पडली भरणे व नंतर भाविकांच्या पडलीत ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ४ वाजता अंधारांना हाक मारणे, भाविकांची गार्‍हाणी व नवस बोलणे, सायंकाळी ५ ते ७ दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम व रात्री ८ वाजता आरोलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. १० मेस सकाळी १० वाजता सर्व अंधारांना हाक मारणे व ओटी भरणे, नवस बोलणे, सायंकाळी ४ वाजता अंधारांना हाक मारणे, सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, नंतर रात्री ८ वाजता सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाचा (पिकुळे) नाट्यप्रयोग होणार आहे. ११ रोजी सकाळपासून ओटी भरणे व सर्व अंधारांना हाक मारणे व रयतेला आशीर्वाद, ११ वाजता दादासाहेब सावंत (कोलगाव-पुणेकर) यांच्यावतीने महाप्रसाद, दुपारी २.३० वाजता अंधारांना हाक मारणे व नंतर पडली महादेवाचे केरवडे येथे प्रस्थान होईल. भाविकांनी पडली सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन देवी सातेरी देवस्थान कमिटी व कोलगाव ग्रामस्थांनी केले आहे.
--------
साटेली-खालचीवाडी येथे
२१ ला विविध कार्यक्रम
सातार्डा, ता. १७ ः साटेली-खालचीवाडी येथील श्री महापुरुष मंदिराचा दुसरा वर्धापनदिन सोहळा २१ ला होणार आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिरामध्ये केले आहे. मंगळवारी सकाळी ९ वा., श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वा. आरती व महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ६.३० वा. अमृताभिषेक साटेली निर्मित गायक सत्यनारायण कळंगुटकर, गायिका ममता प्रभु तबलावादक अक्षय कांबळी, कुणाल आवळे, पखवाज वादक संकेत भगत, संवादिनी वादक गजानन मेस्त्री यांचा अभंग, नाट्यगीत, भक्तीगीतांचा स्वरसंध्या हा सुरेल कार्यक्रम होणार आहे. प्रसाद आडेलकर स्वरसंध्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. ध्वनीसंयोजन शैलेंद्र परब करणार आहेत. त्यानंतर रात्री ९.३० वाजता चेंदवणकर गोरे पारंपरिक दशावतार मंडळाचा कालसर्प तांडव हा नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थित राहाण्याचे आवाहन श्री देव महापुरुष कला, क्रीडा मंडळ व खालचीवाडीतील ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

GT vs KKR Live : कॅमेरून ग्रीनला सूर गवसला, ११ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; पण, कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन्...

Maharashtra CM Relief Fund : ४० हजार रुग्णांना जीवदान! मुख्यमंत्री निधीतून ३३३ कोटींची मोठी मदत, जाणून घ्या कसा मिळतो फायदा

GT vs KKR Live: कॅमेरून ग्रीनचा 'माँस्टर' Six! महागड्या Sierra गाडीला डेंट... TATA देणार ५ लाख, जाणून घ्या नेमकं प्रकरण, Video

Women Reservation Bill : "भारतानं पाहिलं, इंडिया आघाडीनं रोखलं," महिला आरक्षण नामंजूर होताच राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT