कोकण

आंब्याला प्रति झाड ५ हजार रूपये मिळावेत

CD

आंब्याच्या कलमाला पाच हजार द्या
बाळ माने ः आंबा, काजू शेतकऱ्यांची चळवळ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : ग्लोबल वॉर्मिंग, बनावट खते आणि नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणात आंब्याचे पीक फक्त १५ टक्के आहे. कोकणात दीड लाख हेक्टरवर आंबा व तीन लाख हेक्टरवर काजू लागवड असून, सर्व बागायतदार, शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. आंबा कलमाला पाच हजार रुपये व काजू झाडाला तीन हजार रुपये द्यावेत, असे रत्नागिरी तालुका खरेदी -विक्री संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आंबा, काजू बागायतदार गेली दहा वर्षे आक्रोश करत आहेत; परंतु त्यांच्याकडे राज्यशासन किंवा केंद्रशासनही दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी चळवळ उभी केली आहे. कोकणातील सर्व बागायतदार त्यांच्या पाठीशी आहेत, असे सांगून माने म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंग किंवा वातावरणातील प्रचंड बदलाचा फटका आंब्याला बसला आहे. ही नैसर्गिक आपत्ती असून, राज्यशासनाने याची दखल घेऊन केंद्र सरकारकडे मदत मागितल्यास निधी मिळेल. संत्री बागायतदारांची समस्या असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देतात; परंतु आंबा बागायतदारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष का केले जात आहे? राज्य सरकारने २२ हजार कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली असली तरीही अजून पंचनामे झालेले नाहीत. आंब्याच्या झाडाला २२० रुपये मिळतील. त्यातून काहीही होणार नाही. या वेळी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत आदी उपस्थित होते.
--------------
चौकट १
आज बैठक
सर्व गंभीर प्रश्नांवर चर्चा करून पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी शनिवारी (ता. १८) सकाळी १० वा. बालाजी मंगल कार्यालय शांतिनगर येथे शेतकरी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजू शेट्टी मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

GT vs KKR Live : कॅमेरून ग्रीनला सूर गवसला, ११ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; पण, कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन्...

Maharashtra CM Relief Fund : ४० हजार रुग्णांना जीवदान! मुख्यमंत्री निधीतून ३३३ कोटींची मोठी मदत, जाणून घ्या कसा मिळतो फायदा

GT vs KKR Live: कॅमेरून ग्रीनचा 'माँस्टर' Six! महागड्या Sierra गाडीला डेंट... TATA देणार ५ लाख, जाणून घ्या नेमकं प्रकरण, Video

Women Reservation Bill : "भारतानं पाहिलं, इंडिया आघाडीनं रोखलं," महिला आरक्षण नामंजूर होताच राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT