फिरकीपटू राजेश पवार
रविवारी चिपळुणात
चिपळूण, ता. १७ : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्यावतीने शहरातील पवन तलाव मैदानावर आमदार चषक राज्यस्तरीय सीझन बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात सुरू आहे. या स्पर्धेचा समारोप रविवारी (ता. १९) दुपारी दोन वा. होणार असून, अंतिम सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी रणजी क्रिकेटपटू राजेश पवार उपस्थित राहणार आहेत. पवार यांनी अवघ्या १६व्या वर्षी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी ८४ सामन्यांत तब्बल २८१ बळी घेत आपल्या गोलंदाजीची छाप पाडली. त्यांनी मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्वही केले होते. १९९८ ला झालेल्या युवा विश्वचषक स्पर्धेत हरभजन सिंग, मोहम्मद कैफ, अमित पागनीस यांच्यासह त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.