कोकण

चिपळुणातील वीरेश्वर तलावाची दुरवस्था

CD

-rat१७p६.jpg-
26O37884
चिपळूण : शहरातील विरेश्वर तलाव येथील बाकडी मोडली आणि खेळणीही तुटली आहेत.
---
चिपळुणातील ऐतिहासिक विरेश्वर तलावाकडे दुर्लक्ष
तुटलेली बाकडे, नादुरूस्त खेळणी ; गैरप्रकारांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः शहरातील ऐतिहासिक विरेश्वर तलावाची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तलाव परिसरातील बाकडे तुटलेली असून, लहान मुलांसाठी असलेली खेळणीही नादुरूस्त झाली आहेत. त्यामुळे सुटीच्या काळात मुलांना खेळण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने पालकांमध्ये नाराजी आहे.
पालिकेकडून काही वर्षांपूर्वी तलावाची दुरुस्ती करण्यात आली होती; मात्र त्यानंतर देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. तलाव परिसरात काही ठिकाणी मद्यपान, अयोग्य वर्तन यांसारखे प्रकार वाढले असून, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
तलावाभोवतीची संरक्षक भिंतही ठिकठिकाणी तडकली आहे. लोटे एमआयडीसीतील काही कारखानदारांनी सामाजिक दायित्व विभागातून आर्थिक निधी देत येथे निसर्ग गॅलरी उभी केली होती. या गॅलरीमुळे येथे येणाऱ्या मुलांना विविध पक्षी, प्राणी आणि वनस्पतींची माहिती मिळत होती. गॅलरीची देखभाल न राखल्यामुळे ती तोडून टाकण्यात आली आहे. तलावात दोन ठिकाणी चौथरे बांधण्यात आले होते तेही नादुरूस्त झाले आहेत. पालिकेने या तलावाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
---
कोट
तलावात पाणी आहे. परिसरात झाडी आहेत. पालिकेने ओपन जिमसारखी चांगली सुविधा येथे उपलब्ध करून दिली आहे. तलावाच्या सुशोभीकरणाकडे पालिकेने लक्ष दिले तर शहराच्या आणि तलावाच्या सौंदर्यामध्ये आणखीन भर पडेल.

- नित्यानंद भागवत, सामाजिक कार्यकर्ते, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharavi Redevelopment: धारावीचा विकास सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं प्रकल्प कधी पूर्ण होणार?

राज्यसभेच्या २६ जागांसाठी २८ उमेदवार मैदानात, भाजपनं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन; दोन-तृतियांश बहुमतासाठी NDAच्या हालचाली

IND vs AFG : हार्दिक पांड्याचा फिटनेस रिपोर्ट आला समोर... वन डे मालिकेत खेळणार की नाही? रोहित शर्माचं काय?

FIFA World Cup Trophy:"१८ कॅरेट सोनं आणि ६ किलो वजन! फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीची किंमत किती? आकडा वाचलात का?"

Latest Marathi News Update : भारतीय अ संघासाठी ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक!

SCROLL FOR NEXT