तीन कॉलम फोटो आवश्यक
38009
दिव्यांगांना दाखल्यांसाठी
सहकार्यच ः देशपांडे
कणकवली तहसील कार्यालयात शिबिर
कणकवली, ता. १७ : दिव्यांग बांधवांना विविध योजनांसाठी लागणारे दाखले तत्काळ मिळावेत यासाठी महसूल प्रशासन यापुढेही कायम प्रयत्नशील राहील अशी ग्वाही तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी आज दिली.
कणकवली तहसील कार्यालयात दिव्यांग पेन्शन धारकांसाठी हयात दाखला तसेच उत्पन्न दाखला मिळवून देण्यासाठी विशेष शिबिर आज झाले. आज दिवसभरात सुमारे शंभर दिव्यांगांना दाखल्यांने वितरण करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दीक्षांत देशपांडे बोलत होते. यावेळी संजय गांधी शाखेतील हेमलता तोरस्कर, आरती ढोणे, एकता दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत, सचिन सादये, यल्लप्पा कट्टीमणी, श्री. वारंगे, बाळकृष्ण बावकर, मोहन परब यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी दिव्यांग बांधवांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.