swt1715.jpg
38012
आसोली : शाळा क्रमांक १ ला उदय आसोलकर यांनी मुख्याध्यापिका वैभवी रायशिरोडकर यांच्याकडे लॅपटॉप सुपूर्द केला.
माजी विद्यार्थ्यांकडून
आसोली शाळेला लॅपटॉप
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १७ : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्या मंदिर, आसोली क्रमांक १ (ता. वेंगुर्ले) शाळेचे माजी विद्यार्थी उदय भास्कर आसोलकर यांनी शाळेसाठी लॅपटॉप भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी शाळेच्या प्रगतीची दखल घेत मुख्याध्यापिका वैभवी वसंत रायशिरोडकर यांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू प्रदान केली तसेच विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप केले. प्रास्ताविक पदवीधर शिक्षक शिष्यरत पवार यांनी केले. श्री. आसोलकर यांनी शाळेबद्दल दाखवलेला जिव्हाळा, आपुलकी व सामाजिक बांधिलकी ही इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या उदात्त कार्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार असून शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे. आसोलकर यांनी शाळेला केलेल्या सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका रायशिरोडकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.