ओटवणेत गुरुवारपासून
प्रतिष्ठापना सोहळा
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १८ ः ओटवणे तारीवाडी येथील श्री तारीवस मंदिर येथे प्रतिष्ठापना सोहळा व वार्षिक उत्सवानिमित्त २३, २४ व २५ एप्रिल असे तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नेमळे माजी सरपंच विनोद राऊळ यांचे विशेष सहकार्य मिळत आहे.
गुरुवारी (ता. २३) सकाळी ९ वाजता मूर्ती पाषण घेऊन येणे, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता लक्षदीप सोहळा, रात्री ८.३० वाजता राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळाचे (फोंडाघाट) बुवा प्रथमेश चव्हाण (पखवाजड-सुहास सुतार, तबला-लोकेश सोलकर) विरुद्ध श्री दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळाचे (कासार्डे) बुवा उदय पारकर (पखवाज-संकेत पवार, तबला- भावेश लाड) यांच्यात २०×२० डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळी ९ वाजता प्रतिष्ठापना सोहळ्यास प्रारंभ, दुपारी १२ वाजता महाआरती, १.३० वाजता महाप्रसाद, ३ वाजता माहेरची ओटी भरणे कार्यक्रम, रात्री ८ वाजता महाप्रसाद, ९ वाजता रंगमंचाचे उद्घाटन, ९.३० वाजता ‘नृत्यात रंगली नृत्यांगना’ कार्यक्रम, १० वाजता जादूगार अवधूत यांचे जादूचे प्रयोग होतील. शनिवारी (ता. २५) सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता कीर्तन, ७ वाजता माऊली हरिपाठ, रात्री ८ वाजता महाप्रसाद, ९ वाजता गुरुकृपा दशावतार लोककला नाट्यमंडळ (हळवल-कणकवली) यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तारीवाडी मित्रमंडळाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.