कोकण

मालवणात ‘सागरी किल्ले अध्ययन केंद्र’

CD

38129

मालवणात ‘सागरी किल्ले अध्ययन केंद्र’

प्रशासनाकडून मान्यता; सिंधुदुर्ग महाविद्यालयात लवकरच स्थापना

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ ः येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात ‘सागरी किल्ले अध्ययन केंद्र’ स्थापन होणार असून महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत या केंद्राची घोषणा केल्यानंतर महाविद्यालयाने सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शासन, तसेच पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने केंद्र सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग, राजकोट, सर्जेकोट व पद्मदुर्ग या सागरी किल्ल्यांचे ऐतिहासिक, स्थापत्यशास्त्रीय व सांस्कृतिक महत्त्व अत्यंत मोठे आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याला यंदा ३५९ वर्षे पूर्ण झाली असून नुकताच त्याचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर मालवणमधील सिंधुदुर्ग, तसेच इतर सागरी किल्ल्यांवरील शास्त्रशुद्ध अभ्यास, संशोधन व दस्तऐवजीकरणासाठी हे अध्ययन केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मालवण हे या सर्व किल्ल्यांचे केंद्रस्थळ असल्याने येथून या किल्ल्यांचा अभ्यास व व्यवस्थापन प्रभावीपणे करता येणार आहे.
या अध्ययन केंद्रामार्फत जलदुर्गांचा इतिहास, मराठा आरमाराची रणनीती, स्थापत्यशैली व सांस्कृतिक प्रभाव यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. या केंद्रामुळे मालवण हे ‘फोर्ट टुरिझम डेस्टिनेशन’ म्हणून विकसित होण्यास मदत होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी धोरणाचा अभ्यास व प्रचार व्यापक पातळीवर करता येणार आहे. या अध्ययन केंद्राला प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. याबद्दल कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या व सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा जिल्हा बँक, ओरोस येथे सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर, सदस्य विजय केनवडेकर, गुरुनाथ राणे, प्रभारी प्राचार्य कैलास राबते, इतिहास अभ्यासक व संशोधक डॉ. ज्योती बुवा तोरसकर, डॉ. सुमेधा नाईक, प्रा. डॉ. मल्लेश खोत व प्रा. शंकर खोबरे आणि शैलेंद्र दळवी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये धर्मांतरण आणि महिला शोषण प्रकरणात नवा वळण

SCROLL FOR NEXT