जालगाव, कुंभारवाडीत आज रक्तदान शिबिर
गावतळे ः दापोली तालुक्यातील जालगाव, कुंभारवाडी येथील विकास युवक मंडळ आणि भक्त श्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालय, डेरेवण (ता. चिपळूण) यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाच्या ३४व्या वर्धापनदिनानिमित्त उद्या (ता.१९) सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित केले आहे. शिबिर हनुमान मंदिरात होईल. या उपक्रमातून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
क्रीडा प्रबोधिनीतील प्रवेशासाठी चाचणी
रत्नागिरी ः प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत २०२६-२७ साठी विविध क्रीडा प्रबोधिनींमध्ये प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज २३ एप्रिलपर्यंत येथील जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, मिरजोळे एमआयडीसी येथे प्रत्यक्ष किंवा ई-मेलद्वारे सादर करावेत. या संधीचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. या प्रबोधिनींमध्ये निवासी व अनिवासी अशा दोन्ही प्रकारच्या प्रवेशांची सुविधा उपलब्ध आहे. सरळ प्रवेश चाचणी २७ व २८ एप्रिलला तर कौशल्य चाचणी २९ व ३० एप्रिलला होणार आहे.
‘कौशल्य, रोजगार’तर्फे निबंध स्पर्धा
रत्नागिरी ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्यावतीने राज्यभर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्र. साहाय्यक आयुक्त मो. ए. दुधाळ यांनी केले आहे. महिलांविषयी डॉ. आंबेडकर यांचे कार्य आणि महिला सक्षमीकरणातील योगदान या विषयावर निबंध सादर करावयाचा आहे. स्पर्धेसाठी दोन गट निश्चित केले आहेत. पहिल्या गटात शासकीय व खासगी आयटीआय तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. निबंध केवळ मराठी भाषेत सादर करणे आवश्यक असून, हस्तलिखित किंवा टंकलिखित निबंध पीडीएफ स्वरूपात सादर करणे बंधनकारक आहे. या स्पर्धेचा कालावधी २५ एप्रिलपर्यंत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.