

Nirav Modi faces legal setback as UK High Court orders
esakal
UK High Court Orders Nirav Modi to Repay Bank of India Loan : फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला यूके न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. लंडन हायकोर्टाने 'बँक ऑफ इंडिया'च्या बाजूने निकाल देताना, नीरव मोदीला बँकेचे १०.७ दशलक्ष डॉलर्सचे (जे १०० कोटी रुपयांहून अधिक आहेत) कर्ज परत करण्यास जबाबदार धरले आहे. मंगळवारी निकाल देताना लंडन कमर्शियल कोर्टाचे न्यायाधीश सायमन टिंकलर यांनी स्पष्ट केले की, नीरव मोदीने बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्जासाठी वैयक्तिक हमी दिली होती आणि आता तो ती रक्कम परत करण्यास कायदेशीररित्या बांधील आहे.