कोकण

श्री गणपती चरणी भाविक नतमस्तक

CD

38127


रेडीतील श्री गणेश चरणी
हजारो भाविक नतमस्तक

सुवर्णमहोत्सवी वर्ष सोहळा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १८ ः वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील प्रसिद्ध श्री गणपतीचा सुवर्णमहोत्सवी वर्ष सोहळा आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त मंदिरात सकाळी अभिषेक, श्री सत्यविनायक महापूजा, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, स्थानिक भजने, श्री गणेश माऊली संगीत ग्रुप प्रस्तुत ‘स्वर गणेश’ व रात्री नाईक-मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा दशावतारी नाटक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वाढदिवसानिमित्त केलेल्या रोषणाईने मंदिर परिसर खुलून दिसत होता. श्री गणपती मंदिरात आकर्षक फळांची आरास तसेच गणपती सेल्फी पॉईंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्री गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविक भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, मुंबई येथून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. सकाळी मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाले. दुपारी आरती, तीर्थप्रसाद व त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून सुनियोजित पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT