कोकण

क्राईम

CD

सार्वजनिक ठिकाणी
दारू पिणाऱ्यांवर गुन्हे
देवरूख ः देवरूख पोलिसांनी ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी अवैध दारू विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांविरुद्ध दोन स्वतंत्र कारवाया केल्या आहेत. शुक्रवारी पहाटे दीड वाजता कांजिवरा ते रत्नागिरी रोडवर सिमेंटच्या बाकावर बसून दारू पिणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये अभिजित अनंत जाधव (वय ३०) आणि नईम मुनवर पटेल (वय २४) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पथकाने सायंकाळी देवरूख खालचीआळी येथील मच्छीमार्केटच्या पाठीमागे, गणेशघाटाजवळील नदीकिनारी कारवाई केली. तेथे नीलेश बाळकृष्ण निवळकर (वय ३९) हा बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी विक्रीसाठी बाळगून असताना मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून ८ लिटर गावठी दारू आणि इतर साहित्य असा एकूण ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

वाहन तपासणीत
मद्याचा साठा जप्त
दापोली : दापोली शहरात वाहतूक कोंडीच्यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीदरम्यान बेकायदा देशी दारू व बिअरची वाहतूक उघडकीस आली. या प्रकरणात वाहनासह सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ एप्रिलला दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास बसस्थानकाजवळील चौकात वाहतूक कोंडी झाल्याने पोलिस पथक वाहतुकीचे नियमन करत होते. या वेळी मोटार संशयास्पदरीत्या जाताना आढळली. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारू व बिअरचे बॉक्स आढळून आले. वाहनचालक ऋतिक संतोष लांबे याच्याकडे मद्य बाळगण्याचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने वाहन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तपासणीदरम्यान, २ लाख ३० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT